शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: October 23, 2014 00:13 IST

विधानसभेसाठी उमेदवारी प्राप्त न होऊ शकलेल्या नेत्यांची विधान परिषदेची वाट बिकट.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी दूर करण्यासाठी या नेत्यांना पक्षाचे काम करा, तुमचा विधान परिषदेसाठी विचार करू, असा सल्ला व आश्‍वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. मात्र निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांना मिळालेले यश लक्षात घेता असे आश्‍वासन पूर्ण करणे पक्षप्रमुखांना शक्य दिसत नाही. त्यामुळे विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१ व शिवसेना ६३ जागा जिंकली. ही संख्या पाहता विधानपरिषदेवर या पक्षांपैकी प्रत्येकी १ किंवा २ एवढेच सदस्य जाऊ शकतात. निकालामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे त्यांना राजकीय पुनजिर्वन देण्यासाठी विधानपरिषदेचा विचार केला जाईल व त्यांनाच प्राधान्य मिळेल. त्यामुळे विविध मतदारसंघात एमएलसीसाठी शब्द घेणार्‍या नेत्यांना आता विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानसभेतील किमान ३0 जागांमागे एक विधानपरिषदेचा आमदार असे साधारणपणे सूत्र असते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्याही अनेक नेत्यांना विश्रांती घेण्याशिवाय पर्याय नाही. *घटकपक्षांची गोचीमहायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपाइं आठवले गट या पक्षाच्या नेत्यांना विधानपरिषदेचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र या दोन्ही पक्षांची विधानसभेतील एकूण कामगिरी लक्षात घेता या पक्षांनाही विधानपरिषदेवर घेतल्या जाण्याची शक्यता नाही.*आचारसंहिता संपलीविधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने लावलेली आचारसंहिता २२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी संपली. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्यासाठी आता मोकळीक मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दुसर्‍याच दिवशी राजकीय पदाधिकार्‍यांना त्यांची वाहने परत देण्यात आली.