शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राध्यक्ष भाड्यापासून वंचित!

By admin | Updated: October 19, 2014 00:09 IST

शेगाव तालुक्यातील प्रकार, जेवण केले नसतानाही कापले पैसे, १३३ कर्मचा-यांची तक्रार.

शेगाव (बुलडाणा) : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना जिल्हा प्रशासनाने प्रवास भाड्यापासून वंचित ठेवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याशिवाय जेवण निवडणूक आयोगाकडून असतानासुद्धा १५0 रुपये कपात करण्यात आल्याची धक्कादायक बाब कर्मचार्‍यांनी निदर्शना आणली आहे. याबाबत १३३ कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसह दिल्ली येथील मुख्य निर्वाचन आयुक्तांकडे तक्रार केली आहे. याबाबत वृत्त असे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१४ च्या कामासाठी मतदान केंद्राध्यक्ष तथा मतदान अधिकारी म्हणून शासकीय कर्मचार्‍यांची नेमणुक करण्यात आली होती. या साठी १00 ते १५0 किमी अंतरावरून या कर्मचार्‍यांना बोलाविण्यात आले होते. या काळात कर्मचार्‍यांना प्रशिक्षण व निवडणुकीच्या कामासाठी मुख्यालयापासून किमान तीन वेळा जाणे-येणे करावे लागले. यामुळे सरासरी एकूण प्रवास १000 किमी झाला असून, निवडणूक आयोगाने प्रवासभाडे विचारात घेतले जाणार नाही, असे सूचविण्यात आले होते. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली रक्कम ही अत्यंत तोकडी असून, प्रवासभाड्यातच ही रक्कम गेल्याची ओरड कर्मचार्‍यांकडून होत आहे. याबाबत २४ सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील १३३ कर्मचार्‍यांनी मुख्य निर्वाचन आयुक्त, राज्य निवडणुक आयोग, मानवाधिकार आयोग यांच्यासह जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, निवडणुक आयोगाने मतदान अधिकार्‍यांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले असतानासुद्धा मतदान केंद्रावर साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली नसल्याने खूप त्रास सहन करावा लागला. याशिवाय प्रत्येक निवडणुकीत जेवण हे शासनाकडून आता मिळत होते. मात्र, या वेळेस प्रत्येकी १५0 रुपये जेवणाची कपात करण्यात आली. विशेष म्हणजे ५0 टक्क्क्य़ांपेक्षा जास्त कर्मचार्‍यांनी जेवणसुद्धा केले नाही. तरीही १५0 रुपयांचा भुर्दंड कर्मचार्‍यांना देऊन प्रशासनाने एक प्रकारे जेवनाचा व्यवसायच केल्याचा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. प्रवासभाडे आणि जेवनाची रक्कम ता त्काळ परत मिळावी, अन्यथा निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.