बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात सन २00६- २00७ मध्ये झालेल्या चालक-वाहक भरती घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेले तत्कालीन विभाग नियंत्रक बी.एन. लाळीकर यांच्या विरुद्ध बुलडाणा पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१)(ड) सह १३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर लाळीकर यांच्या औरंगाबाद येथील घराची झडती घेण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत. याबाबत माहिती अशी की, सन २00६-२00७ मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात विभाग नियंत्रक म्हणून बी.एन. लाळीकर हे पदावर होते. त्यांच्या कार्यकाळात बुलडाणा विभागात चालक व वाहक पदाची नोकर भरती झाली होती; मात्र या भरती प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार एस.टी.चे अमरावती येथील दक्षता व सुरक्षा अधिकारी भवरसिंह शेखावत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा कार्यालयाने लाळीकर यांची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत लाळीकर यांनी आपल्या पदाचा दुरपयोग करून तसेच राज्य परिवहन महामंडळाचे नियम व आदेश डावलुन पात्र नसलेल्या वाहक -चालकांना नियुक्त्या दिल्याचे उघड झाले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एस.एल.मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी लाळीकर यांच्या विरुद्ध वरील गुन्हे दाखल केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एस.एल.मुंढे, पोलिस निरीक्षक वानखेडे, एएसआय भांगे, पोहेकाँ शेगोकार, नवरे, गडाख, शेळके, ठाकरे, जंजाळ, चोपडे, ढोकणे, सोळंके, वारूळे, राजनकर, यादव हे करीत आहेत.
विभाग नियंत्रक लाळीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: May 16, 2014 00:06 IST
चालक-वाहक भरती घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेले तत्कालीन विभाग नियंत्रक बी.एन. लाळीकर यांच्या विरुद्ध बुलडाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
विभाग नियंत्रक लाळीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}