उभ्या ट्रॉलीवर कार धडकली

By Admin | Updated: May 31, 2014 23:54 IST2014-05-31T23:48:52+5:302014-05-31T23:54:46+5:30

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी रस्त्यावरील अपघात; जीवीत हानी नाही.

The car hit the vertical trolley | उभ्या ट्रॉलीवर कार धडकली

उभ्या ट्रॉलीवर कार धडकली

मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी रोडवर उभ्या असलेल्या ट्रॉलीला टाटा इंडीगोने जबर धडक दिल्याची घटना ३0 मे रोजी रात्री दरम्यान घडली. सुदैवाने या अपघातात जीवीत हानी झाली नाही. मेहकर-चिखली रोडवर देऊळगाव माळी फाट्यानजीक गिट्टीने भरलेली ट्रॉली उभी होती. दरम्यान एम.एच.२७ एक्स ९२९७ क्रमांकाच्या टाटा इंडीगो गाडीने ट्रॉलीला जबर धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणीतीही जीवीत हानी झाली नसून, गाडीचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. एक दिवस अगोदर सुद्धा याच ट्रॉलीला व अशाच प्रकारे एका एस.टी. बसने मागून धडक दिली होती. भर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातास आमंत्रण दिल्या जात आहे.

Web Title: The car hit the vertical trolley