कठड्याअभावी कारचा अपघात

By Admin | Updated: January 6, 2017 02:31 IST2017-01-06T02:31:51+5:302017-01-06T02:31:51+5:30

किनगावराजा गावालगत असलेल्या पुलाला कठडे नसल्यामुळे ५ जानेवारी रोजी कारचा अपघात झाला.

Car accident due to rigging | कठड्याअभावी कारचा अपघात

कठड्याअभावी कारचा अपघात

किनगावराजा, दि. ५- येथील गावालगत असलेल्या पुलाला कठडे नसल्यामुळे ५ जानेवारी रोजी कारचा अपघात झाला.
मेहकर तालुक्यातील परतापूर येथील ज्ञानेश्‍वर साहेबराव गाडेकर हे एम.एच.२८ व्ही.८५५३ क्रमांकाच्या कारने बहिणीला जालना येथून सोडून मेहकरकडे परत जात होते. पुलावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे सदर कार पुलावरुन नदीत कोसळणार होती; परंतु पुलाला लागून कठड्याच्या भिंतीवर सदर कार अडकली. या पुलाला कठडे नसल्यामुळे यापूर्वीसुद्धा दोन-तीन अपघात असेच घडले होते, तरी संबंधित खात्याने या पुलाचे कठडे पूर्ववत बसवावे व होणारे अपघात टाळावे, अशी जनतेतून मागणी होत आहे. या रस्त्याने शाळेकरी मुले सायकलवर ये-जा करीत असतात. या ठिकाणी यापूर्वीही अनेकदा अपघात घडले.

Web Title: Car accident due to rigging