शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रकातील बदलाने परीक्षार्थ्याची तारांबळ

By admin | Updated: May 9, 2015 01:53 IST

परीक्षार्थीसमोर विवाह की पेपर? असा पेच.

लोणार : तालुक्यातील डॉ.लाहोटी बी.एड्. महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळा पत्रकावरून विवाह ९ मे रोजी ठेवला होता; परंतु बी.एड्.चा २0 एप्रिल रोजी होणारा पेपर विद्यापीठाने रद्द करून ९ मे रोजी ठेवल्याने परीक्षार्थ्याची तारांबळ उडाली असून, परीक्षार्थीसमोर विवाह की पेपर? असा पेच निर्माण झाला आहे. मनुष्याच्या आयुष्यात सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे लग्न सोहळा, आयुष्यातील सतरा भानगडी बाजूला ठेवून लग्न सोहळ्याचा मुहूर्त काढल्या जातो; मात्र एवढे करूनही लग्नाच्या दिवशी विघ्न आलेच तर त्याला काय म्हणावं. तालुक्यातील डॉ.लाहोटी बी.एड्. महाविद्यालयात सत्र २0१४-१५ मध्ये बी.एड्.चे शिक्षण घेणार्‍या विजय बबन सानप या विद्यार्थ्याने बीएड्च्या परीक्षेचे वेळापत्रक पाहून आपल्या लग्नाचा मुहूर्त काढला होता; परंतु २0 एप्रिल रोजी होणारा भारतीय समाजशील शिक्षक विषयाच्या पेपरच्या पाकीटात शैक्षणिक मानसशास्त्र विषयाचा पेपर निघाला. त्यामुळे २0 एप्रिल रोजी होणारा उद्योन्मुख भारतीय समाजशील शिक्षक विषयाचा पेपर विद्यापीठाने रद्द करून ९ मे रोजी ठेवला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे परीक्षेच्या वेळा पत्रकात बदल होऊन विजयच्या ऐन विवाहाच्या दिवशी पेपरचा मुहूर्त ठरला. यामुळे विजयसमोर विवाह की पेपर? असा पेच निर्माण झाला आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून विजयने शिक्षणाला प्राधान्य देत हळद लावलेल्या अंगाने का होईना पेपर देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराने लग्न सोहळ्याच्या दिवशी विजयला आयुष्याच्या वळणावर दोन महत्त्वपूर्ण परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.