शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात शाईच्या साडेचार हजार बाटल्यांची गरज

By admin | Updated: October 11, 2014 23:19 IST

१९९१ मतदान केंद्रांसाठी शाईचा पुरवठा.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या प्रक्रियेसाठी बुलडाणा जिल्ह्यात साडेचार हजारांपेक्षा जास्त शाईच्या बाटल्या लागणार आहेत. एक शाईची बाटली ३५ ते ४0 मतदारांना पुरते. मात्र, मतदानाच्या दिवशी कमतरता पडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जात आहे. मतदान करण्या पूर्वी डाव्या हाताच्या बोटाच्या नखाला शाई लावण्यात येते. ही त्या व्यक्तीने मतदान केल्याची ओळख असते. ही शाई पुसणे सध्या तरी शक्य नाही. शाई बोटावर दिसत असताना कोणी मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. शाई बोटाला लावल्यानंतर ती किमान तीन आठवडे तरी पुसली जात नाही. मतदान करताना डाव्या हाताच्या बोटाला लावण्यात येणारी गडद निळ्या रंगाची शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या सरकारी कंपनीद्वारे बनविण्यात येते. सन १९६२ पासून या कंपनीद्वारे उत्पादित करण्यात येणार्‍या शाईचा वापर मतदान केंद्रांवर केला जातो. निवडणूक विभागाच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी व नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या (एनआरडीसी) विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही शाई तयार केली जाते. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई तीन आठवड्यापर्यंत पुसता येत नाही. ही शाई पुसण्यासाठी बाजारात कोणत्याही प्रकारचे केमिकल उपलब्ध नसल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे यांनी स्पष्ट के ले. मतदारसंघ          शाई बॉटल                     मतदानकेंद्रमलकापूर              ६५0                               २७३बुलडाणा               ६५0                               २७५चिखली                ६५0                                २७२सिंदखेडराजा         ७५0                                ३१४मेहकर                 ७00                                २९६खामगाव             ६९0                                  २९१जळगाव जा.        ६५0                                  २७0