शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

बुलडाणा:  जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरच सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:58 AM

जिल्हा सामान्य रुग्णालयात तर तज्ज्ञ डॉक्टरच सापडत नसल्याचा प्रकार २८ मार्च रोजी ‘लोकमत स्टिंग आॅपरेशनमुळे’ समोर आला आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या भीतीने खासगी वैद्यकीय सेवेमध्येही लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. सोनोग्राफी सेंटर चालकानीही आपले दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे रुग्णांची धाव आता शासकीय रुग्णालयाकडे सुरू आहे. परंतू शासकीय रुग्णालयांमध्ये सुद्धा सुविधांचा अभाव दिसून येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर तज्ज्ञ डॉक्टरच सापडत नसल्याचा प्रकार २८ मार्च रोजी ‘लोकमत स्टिंग आॅपरेशनमुळे’ समोर आला आहे.कोरोनाची दहशत सर्वत्र निर्माण झाली आहे. आता वातावरणातील बदलामुळे छोटे-मोठे आजारही डोकेवर काढत आहेत. अगोदरच कोरोनामुळे भयभीत झालेल्यांना आता सर्दी, ताप, खोकला, कान, नाक, घसा दुखणे यासाखे आजारांचाही सामना करावा लागत आहे. वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर २७ व २८ मार्च रोजी ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ केले असता वैद्यकीय सेवेतील अनेक कच्चे दुवे समोर आले. शहरातील नामांकित खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केल्याचे दिसून येत आहे. सोबतच कोनोग्राफी सेंटर चालकांनीही सोनोग्राफी केंद्र बंद केले आहे. ज्यांठिकाणी सोनोग्राफी केंद्र सुरू होते, त्याठिकाणी डॉक्टर हजर नव्हते. खासगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दवाखाने बंद ठेवले जात आहेत. सामान्य रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत. रुग्णांना वैद्यकीय तज्ञांची प्रतीक्षा करावी लागत आहे; याचा प्रत्यय ‘इएनटी’ विभागामध्ये आला.

असे झाले स्टिंग‘लोकमत’ प्रतिनिधींनी २७ व २८ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील दवाखान्यांची पाहणी केली. यामध्ये शहरातील अनेक दवाखाने बंद दिसून आले. सोनोग्राफी सेंटरही बंद होते. २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयत रुग्ण म्हणून प्रतिनिधी गेले. त्याठिकाणी बाह्य रुग्ण विभागामध्ये १० रुपयांची पावती घेऊन तपासणीसाठी नोंद केली. तपासणीकरीता ‘इएनटी’ विभागासमोर प्रतिनिधी बसले. परंतू ११ वाजेपर्यंत कान, नाक, घसा तज्ञ आलेच नव्हते. त्यानंतर दुसºया दिवशी २८ मार्चला सकाळी १२.३० वाजता इएनटी विभागाची पाहणी केली असता तज्ञ डॉक्टराच्या रिकाम्या खुर्चीला फॅन हवा घालत असल्याचे दिसून आले.

बाळाच्या आईच्या चेस्टमध्ये गाठ असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली. परंतू बुलडाणा शहरातील आठ ते दहा सोनोग्राफी केंद्रावर जाऊन विचारणा केली असता काही केंद्र बंद होते. तर काही ठिकाणी डॉक्टर हजर नव्हते.- प्रकाश चनखोरे, रुग्णाचे नातेवाईक़

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल