शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर टेस्टमध्ये पश्चिम विदर्भात बुलडाणा जिल्हा आघाडीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 11:05 IST

Buldana district leads in RTPCR test : गेल्या ३९ दिवसांमध्ये १ लाख ४० हजार २३१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 - ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोना टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढलेले आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या ३९ दिवसांमध्ये १ लाख ४० हजार २३१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये पश्चिम विदर्भात जिल्हा आघाडीवर आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कोरोना तपासणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये नव्हे, तर खासगी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथिमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कोरोना तपासणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रॅपिड टेस्टचे शिबिर घेण्यात येत आहे. गावागावांत कोरोना तपासणी मोहीम सुरू आहे. त्यामुळे बाधितांचा आकडाही वाढत आहे. जिल्ह्यात १ मार्च २०२१ पासून आतापर्यंत १ लाख ४० हजार २३१ कोरोना तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात होणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्या सर्वाधिक आहेत. तपासणीबरोबरच पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाणही बुलडाणा जिल्ह्यात अधिक आहे. 

विभागातील २४ टक्के चाचण्या बुलडाण्याच्याअमरावती विभागामध्ये १ मार्च २०२१ पासून आतापर्यंत ५ लाख ७६ हजार ४२० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २४ टक्के चाचण्या बुलडाणा जिल्ह्याच्या आहेत. तर सर्वांत कमी चाचण्या वाशिम जिल्ह्यातून करण्यात आलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात अवघ्या १३ टक्के चाचण्या झाल्या आहेत. 

सर्वांच्या समन्वयामुळे कोरोना टेस्ट वाढल्या आहेत. आरोग्य विभागाच्या प्रत्येक केंद्रांवरही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी तसेच कुठलेही लक्ष आढळून आल्यास तातडीने कोरोना टेस्ट करून घ्यावी. - डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा