शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटे तोडणार

By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST

वापरण्यात न आलेल्या या ओटे बांधकामावर झालेला १३.३0 लक्ष रुपयांचा खर्च व्यर्थ ठरणार आहे.

शेगाव : एकात्मीक शहर योजनेमधून दैनंदिन व साप्ताहीक बाजाराकरिता वर्षे २00९ मध्ये चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेल्या ८४ ओटे न.प. तोडण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे वापरण्यात न आलेल्या या ओटे बांधकामावर झालेला १३.३0 लक्ष रुपयांचा खर्च व्यर्थ ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात लोकमतने ह्यशेगावचा दैनंदिन आठवडी बाजार रस्त्यावरह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये तत्कालीन शहर विकास योजनेमध्ये चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेले ८४ ओटे ज्याचा वापर आजपर्यंत एकाही भाजी विक्रेत्याने केलेला नाही व त्यामुळेच बाजार रस्त्यावर भरत असल्याचे समोर आणले होते. सदरहू बातमीनंतर न.प.ने उपरोक्त ओटे व त्याच्या बाजुला असलेली न.प.मालकीची जागा हे दोन्ही मिळून त्या ठिकाणी बी.ओ.टी.तत्वावर (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) व्यापारी संकुल व भाजी विक्रेत्यांकरिता योग्य पध्दतीने पुन्हा बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बिओटी तत्वावर बांधण्यात येणार्‍या व्यापारी संकुल व नविन ओटे यांच्या नकाशामध्ये जुन्या ओट्यांची जागा दाखविण्यात आलेली आहे. तर अंदाजकीय पत्रामध्ये सुध्दा नविन ओट्यांचा समावेश दाखविण्यात आलेला आहे. याचाच अर्थ जुने ओटे पाडल्या जाणार एवढे मात्र निश्‍चित !
एकात्मीक विकास योजनेमध्ये वर्षे २00९ मध्ये बांधण्यात आलेल्या या ८४ ओट्यांवर एकूण १३.३0 लक्ष रुपये खर्च करण्यात आलेला आहे. या ओट्यांना नगरविकास रचनाकार यांनी स्टॅन्डर्ड परिमापकाप्रमाणे मंजुरात देऊन ओट्यांच्या नकाशाला मंजुरात दिली होती. बांधून झाल्यानंतर सदरहू ओटे हे भाजी विक्रेत्यांकरिता कुचकामी ठरलेले असून पाऊस, ऊन यापासून कुठलाही बचाव होत नव्हता. एवढे चुकीचे असताना नगरविकास रचनाकाराने त्याला मंजुरात कशी दिली? व न.प.चे ही लक्षात का बरं येवू नये? असा प्रश्न निर्माण होतो. आता ते ओटे पाडले जातील तर त्यावर झालेल्या १३.३0 कोटी खर्चाचे काय? याचाच अर्थ शेगावचे नागरिक इमाने-इतबारे नगर पालिकेने आकारलेला कर भरतात व नगर पालिका त्याचा असा चुकीच्या पध्दतीने विनिमय करते.