मेहकरात ६५ दात्याचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST2021-04-15T04:33:09+5:302021-04-15T04:33:09+5:30

या वेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले . सत्यजित अर्बन परिवाराच्या सौजन्याने व भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी ...

Blood donation of 65 donors in Mehkar | मेहकरात ६५ दात्याचे रक्तदान

मेहकरात ६५ दात्याचे रक्तदान

या वेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

सत्यजित अर्बन परिवाराच्या सौजन्याने व भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर होते तर उद्घाटक बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे हे होते. या वेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष नेते ॲड. अनंतराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, कलिम खान, सुदेश लोढे, भूषण देशमुख, भास्कर काळे, समाधान सुपेकर चिखली, राजेश मापारी, डी़ जी़ गायकवाड , माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, गजानन सावंत, प्रभाकर सपकाळ, विनोद पऱ्हाड, डॉ. शेषराव बदर, संजय म्हस्के, शैलेश बावस्कर, किशोर गवई, युनूस पटेल, प्रा. संजय वानखेडे, सुनील अंभोरे, रियाज कुरेशी, छोटू गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजक कैलास सुखधाने यांनी प्रास्ताविक केले़ उपक्रमाला मेहकर शहरातील भीमसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला़ या वेळी डॉ. पंजाबराव शेजुळ, डॉ़ विजय चऱ्हाटे, माधवराव जाधव, गिरिधर पाटील ठाकरे, पं. स़ चे सहायक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे इत्यादी अनेक मान्यवरांनी शिबिराला भेटी दिल्या. संचालन युनूस पटेल यांनी केले तर आभार प्रा़ विनोद पऱ्हाड यांनी मानले.

Web Title: Blood donation of 65 donors in Mehkar