शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
3
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
4
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
5
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
6
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
7
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
8
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
9
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
10
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
11
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
12
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
13
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
14
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
15
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
16
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
17
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
18
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
19
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
20
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांसाठी भारिपचे धरणे

By admin | Updated: June 7, 2014 00:18 IST

संग्रामपूर तालुक्यातील समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे

संग्रामपूर : तालुक्यातील विविध समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने विविध समस्यांसाठी आज ६ जून रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांच्या समस्या, शेतकरी, शेतमजुरांचा त्यांच्या प्रश्नांसाठी भारिप-बमसंने एल्गार पुकारला.
सोनाळा गावातील अतिक्रमण हटवून गरीबांच्या घरांचे नुकसान केले त्यांना आर्थिक भरपाई देवून जागेचे कायम पट्टे देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेचे अनुदान दीड लाख रुपये करण्यात यावे, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वाढवून २ हजार रुपये करण्यात यावे, विभक्त कुटुंबांना त्वरित विभक्त रेशनकार्ड देण्यात यावे, शेतकरी शेतमजुरांना मासिक २000 रु. पेन्शन देण्यात यावे, शासकीय कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात यावी आदी १३ मागण्यांसाठी सदर धरणे आंदोलन होते. यावेळी देविदास दामोदर, तेजराव इंगळे, प्रल्हाद दातार, दशरथ सुरडकर, वसुलकर काका, रवींद्र भेलके, हुसेनभाई, दशरथ लोणकर, वसंतराव पाटील, चेतन पाटील, दिनकरराव दाभाडे, भारत वानखडे, अरुण निंबोळकार, विजय पहुरकर, उत्तम उमाळे, गौतम इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार काझी व नायब तहसीलदार दाभाडे यांनी धरणे मंडपात येऊन आंदोलनकर्त्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. या धरणे आंदोलनात संग्रामपूर तालुक्यातील ५00 च्या वर महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीराम बांगर यांनी केले.