शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

चौकांचे सौंदर्यीकरण रखडले

By admin | Updated: December 28, 2014 00:30 IST

बुलडाण्यातील चौक झाले भकास: संस्थानी पुढाकार घ्यावा.

बुलडाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाण्याच्या सौंदर्यीकरणाला सध्या अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. शहरातील प्रत्येक चौकाला इतिहास असून, शहराच्या राजकीय, सांस्कृतिक घडमोडीचा केंद्रबिंदू आहे; मात्र या चौकाच्या सौंदर्यीकरणाबाबत पुढाकार घेतला जात नाही. सौंदर्यीकरणाच्या कुठल्याही खाणाखुणा चौकात दिसत नाहीत. अतिशय गजबजलेल्या चौकांना आलेल्या बकालपणामुळे शहराचे सौंदर्य हरविले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस खोळंबा निर्माण होतो. काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.सौंदर्यीकरणामुळे केवळ चौक सुंदर दिसतो असे नाही, तर चौकातून होणार्‍या वाहतुकीलाही शिस्त लागू शकते. बुलडाणा शहरात अनेक सामाजिक व व्यावसायिक संघटना या कामी पुढाकार घेऊ शकतात. नगरपालिकेने चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी अशा संस्थाकडून सहकार्य घेऊन शहराचे सौंदर्य वाढविणे सहज शक्य आहे. जयस्तंभ, संगम, स्टेट बँक व कारंजा या प्रमुख चौकांसोबतच त्रिशरण चौक, तहसील चौक, भोंडेसरकार चौक अशा चौकांचाही सौंदर्यीकरणाबाबत विचार केला पाहिजे. शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक, पतसंस्थेच्या सहकार्यातून अशा चौकांचे सौंदर्यीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यातही भर पडेल व वाहतुकीलाही शिस्त लागेल. या दृष्टीने पालिकेने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.