पोलिसांसह सेवानवृत्त कर्मचा-यांकडेही लक्ष

By Admin | Updated: June 6, 2015 00:50 IST2015-06-06T00:50:43+5:302015-06-06T00:50:43+5:30

बुलडाणा पोलीस अधीक्षकांनी ठरवून दिले धोरण.

Attention to the retired employees including the police | पोलिसांसह सेवानवृत्त कर्मचा-यांकडेही लक्ष

पोलिसांसह सेवानवृत्त कर्मचा-यांकडेही लक्ष

बुलडाणा : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर संजय बाविस्कर यांनी पोलिसांना विश्‍वास देण्याचे काम सुरू केले आहे. केवळ कर्तव्यावर असणारे पोलिसच नव्हे तर सेवानवृत्त पोलिसांचीही काळजी घेण्याचे धोरण त्यांनी हाती घेतले असून, ह्यपोलीस वेलफेअरह्ण संदर्भात २ जून रोजी एक परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना सूचना दिल्या आहेत. बाविस्कर यांनी पदभार घेण्यापूर्वी ४४५ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामधील १८६ पोलिसांना बदलीच्या ठिकाणाची अडचण होती. त्यासंदर्भात बाविस्करांनी पोलीस कर्मचार्‍यांची भूमिका जाणून घेत प्रत्येकाची अडचण सोडवित पुन:र्नियुक्त्या दिल्या आहेत. यामुळे पोलीस कुटुंबांमध्ये कमालीच्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. केवळ कर्तव्यावरील पोलीसच नव्हे तर सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍यांसाठी त्यांनी विशेष धोरण हाती घेतले असून, दर महिन्यात सेवानवृत्त होणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचा महिन्याअखेर जिल्हास्तरावर निरोप समारंभ केला जावा, अशी सूचना केली आहे. पोलीस मुख्यालय किंवा काही मिटींगमध्ये सेवानवृत्त कर्मचार्‍यांचा सपत्निक सत्कार केला जाईल, असे निर्देश त्यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत. त्याच्या या कर्मचारीभिमुख धोरणामुळे पोलीसदलात आनंदाचे वातावरण आहे

Web Title: Attention to the retired employees including the police