शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 14:01 IST

ड्रीम व्हॅली मल्टीसर्विसेसवर छापा मारुन रेल्वे पोलिसांनी दुकानाच्या संचालकास अटक केली

बुलडाणा: रेल्वची वेबसाईट हॅक करुन रेल्वे तिकिटांची अवैध विक्री सुरु असल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी बुलडाण्यात उघडकीस आला. याप्रकरणी शहरातील स्टेट बँक चौक परिसरातील ड्रीम व्हॅली मल्टीसर्विसेसवर छापा मारुन रेल्वे पोलिसांनी दुकानाच्या संचालकास अटक केली. या कारवाईत संगणक, प्रिंटर, मोबाईल, नेटसेटर जप्त करण्यात आले.दिवाळीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यातच तिकिटांचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. अशावेळी नागरिकांना तत्काळचे तिकीट देण्यासाठी एजंटचे प्रयत्न सुरु असतात. शहरातील स्टेट बँक चौक परिसरातील ड्रीम व्हॅली मल्टी सर्विसेसचा संचालक सुनील वाघ गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक करीत होता. वेबसाईट हॅक करुन तो तिकीट काढायचा. या वेबसाईटवर एजंटला चार ते पाच तिकीट बुक करण्याची सोय असते. मात्र सुनील वाघ ही साईट हॅक करुन कित्येक कन्फर्म तिकीट काढायचा. रेल्वेच्या सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. आरपीएफच्या पथकाने सुनील वाघ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे पुढील दिवसांचे अनेक कन्फर्म तिकीट आढळून आले.याप्रकरणी आरोपीविरुध्द रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी, अधिकाºयांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का याबाबत चौकशी सुरु आहे. या कारवाईत रेल्वे सुरक्षा बलचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दिक्षीत यांच्या पथकातील निरीक्षक राजेश बनकर, उपनिरीक्षक आर. के. सिंग, सी. एस. सातपुते, प्रधान आरक्षक नितीन लोखंडे, आरक्षक शेख नावेद, प्रमोद ढोले, सुजित यादव, संतोष यादव यांनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी