रस्त्यांसाठी एक काेटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST2021-05-15T04:33:16+5:302021-05-15T04:33:16+5:30

माेताळा : तालुक्यातील गावांमध्ये २०२०/२१ या आर्थिक वर्षासाठी रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत एक कोटी रुपयांचा ...

Approved a Kati fund for roads | रस्त्यांसाठी एक काेटींचा निधी मंजूर

रस्त्यांसाठी एक काेटींचा निधी मंजूर

माेताळा : तालुक्यातील गावांमध्ये २०२०/२१ या आर्थिक वर्षासाठी रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ आमदार संजय गायकवाड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला हाेता़ त्याला यश आले आहे़ लवकरच तालुक्यातील रस्त्याची कामे सुरू करण्यात येणार आहे़

तालुक्यातील वडगाव महाळूंगी ते जिल्हा सीमा रस्ता, गुगळी रिधोरा रस्ता, पोखरी ते रिधोरा रस्ता व रा. मा. ला जोडणारा तिघ्रा जोड रस्ता आणि पिंपळगाव देवी- महाळूंगी- धा बढे- ब्राम्हदा- कोऱ्हाळा- कुऱ्हा- दाभा - खामखेड- खडकी ते प्र.रा.मा. रस्ता, इत्यादी कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे़ रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले़ गत काही दिवसांपसून रस्त्याची दुरवस्था झाली हाेती़ निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्यांची कामे लवकरच सुरू हाेणार आहेत़

Web Title: Approved a Kati fund for roads