अन् माणुसकी धावून आली!

By Admin | Updated: September 22, 2015 01:58 IST2015-09-22T01:58:35+5:302015-09-22T01:58:35+5:30

मोताळा येथील वृद्ध महिलेस व्हॉटस् अँपमुळे मिळाली मदत.

And humanity came running! | अन् माणुसकी धावून आली!

अन् माणुसकी धावून आली!

मोताळा (जि. बुलडाणा) : डिडोळा बु. येथे १८ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसाने तालुक्यातील येथील यमुनाबाई नामदेव मिरगे या विधवा महिलेचे मातीचे घर कोसळले होते. त्यामुळे विधवा महिलेसमोर मोठे संकट निर्माण झाले होते; मात्र गावातील जागृत नागरिकांनी मदत उभी करून माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. मागील पाच वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचे निधन झालेले असून, मूलबाळ नाही, अशी परिस्थिती आहे. या महिलेच्या घरावरील आपत्तीची पोस्ट डिडोळा येथील ङ्म्रीकृष्ण शेलकार यांनी व्हॉटस अँपवर टाकली. व्हॉटस् अँपवरील ही पोस्ट वाचताच याच ग्रूपमधील सहृदयी सदस्य कैलास गावंडे यांनी तत्काळ डिडोळा बु: गाव गाठले आणि यमुनाबाई मिरगे यांना आर्थिक मदत देऊन महिलेला धीर दिला. कैलासभाऊ गावंडे यांनी त्या निराधार विधवा महिलेला मदत देण्याची दाखविलेली तत्परता ही माणुसकीचा प्रत्यय देणारी ठरली आहे.

Web Title: And humanity came running!