शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेच्या तिरावर वसलेले पुरातन शिव मंदिर

By admin | Updated: August 18, 2014 00:16 IST

श्रावण विशेष : कोलवड येथे भाविकांची मांदियाळी

बुलडाणा : तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंथी शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे ङ्म्रध्दास्थान आहे. पैनगंगा व वरखडी नद्यांच्या संगमावर शिवशंकराचे हेमाडपंथी जागृत मंदिर दगडाच्या चिर्‍यामध्ये बांधले होते, अशी माहिती मिळते. हे मंदिर जिर्ण झाल्यामुळे कोलवड ग्रामस्थ व सागवन येथील माधवआप्पा यांनी मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला होता. हेमाडपंथी मंदिर असतांना मंदिरातील पिंड खोलवर होती. परंतु जिर्णोध्दार करतांना ग्रामस्थांच्या विचार विनिमयानंतर शंकराची पिंड वर घेण्यात आली. तर मंदिराच्या जुन्या दगडाचा उपयोग पायाभरणीमध्ये करून षटकोनी सिमेंटच्या विटात मंदिराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सहाकार्य केले. त्यानंतर भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात आला. या मंदिराची स्थापना कोणी केली याबाबत माहिती मिळत नसली तरी मंदिर परिसरात मोठे पिंपळाचे जुने झाड व मंदिरासमोर दिपमाळ होती, असे वृध्दमंडळी सांगतात. कालांतराने दिपमाळ पाडण्यात आल्याने त्याठिकाणी गणपतीची मुर्ती आढळली. यावेळी सागवनचे बसू आप्पा यांनी मोठय़ा भक्तीभावाने या गणपतीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधून दिले. वतनदार पहाडसिंग पाटील व म्हातारजी पाटील यांनी मंदिरावर जाणार्‍या रस्त्यासाठी जागा दिल्याने रस्ता तयार करण्यात आला. मंदिर परिसरातील सोयी सुविधेमुळे काही भाविक भक्त आपल्या मुलामुलींचे लग्न या ठिकाणी लावतात. तर ङ्म्रावण महिन्यानिमित्त भंडार्‍याचे आयोजनही या ठिकाणी नियमित करण्यात येते. याठिकाणी भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून शिवमंदिर ट्रस्ट प्रयत्न करीत असल्याचे साखरे महाराज व रामराव पाटील बाबा यांनी सांगितले.