शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! घटसर्पाच्या संसर्गाने आठ वर्षीय चिमुकला दगावला

By निलेश जोशी | Updated: August 3, 2024 23:44 IST

चिखलीमधील पालकवर्गात पसरली धास्ती!

चिखली (जि. बुलढाणा) : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील ८ वर्षीय चिमुकल्याचा घटसर्पाच्या (डिप्थेरिया) प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेतील मृतक बालकाचे नाव जैद खान अन्सार खान कुरेशी, असे आहे.

येथील अन्सार खान कुरेशी यांचा आठ वर्षीय चिमुकला जैद खान कुरेशी याला गत शनिवारी घशाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी खासगी बालरोग तज्ज्ञाकडे नेण्यात आले; मात्र संसर्ग कमी झाला नसल्याने त्यास बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथेही जैदच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्याअनुषंगाने जैदला त्याच्या कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील उपचारादरम्यान जैदला घटसर्पाची (डिप्थेरिया) लागण झाल्याचे निदान झाल्याने त्याअनुषंगाने डॉक्टरांनी उपचार चालविले होते. मात्र, उपचारादरम्यानच जैदचा ३ ऑगस्टच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने या भागातील डॉ. हुसेन उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह प्रभाग १० मधील बालकांची तपासणी लसीकरणाचे काम हाती घेतले आहे.

घटसर्प (डिप्थेरिया) कशामुळे होतो?घटसर्प (डिप्थेरिया) हा कॉनेबॅक्टेरियम या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य जीवाणू रोग आहे. डिप्थेरिया हा सहसा १ ते ११ वर्षांतील मुलांना होतो. याच्या संसर्गामुळे घशाच्या मागच्या बाजूला जाड आवरण येते, ज्यामुळे खायला आणि गिळायला खूप त्रास होतो. सामान्यत: जंतूमुळे नाक आणि घशावर परिणाम होतो.

ही आहेत लक्षणेताप येणे, थंडी वाजणे, सतत खोकला होणे, लाळ गळणे, घशात खवखवणे, गिळायला त्रास होणे, नाकातून पाणी गळणे किंवा रक्तस्त्राव होणे, त्वचेवर व्रण येणे. बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य पथके स्थापन केली असून, मृतांच्या नातेवाइकांना एरिथ्रो मायसिन औषध देण्यासह या भागातील सर्व बालकांचे लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.-डॉ. अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा घटना अत्यंत वेदनादायी आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. पालकांनी जागरूकतेने पाल्यांना लसीकरण करावे. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा.-श्वेता महाले, आमदार, चिखली

टॅग्स :buldhanaबुलडाणा