शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेत विविध विभाग तसेच संस्थाकडून वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

खामगाव : शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेत विविध विभाग तसेच संस्थाकडून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण केले जाते. यावर्षी खामगाव पंचायत समितीला २७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजना अंमलात आणली. लाखो रूपये खर्च करून वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक विभागाला लक्ष्यांक देण्यात येते. कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग याबरोबरच ग्रामपंचायतींनाही शतकोटी वृक्ष लागवड योजनेची जबाबदारी देण्यात येते. खामगाव पंचायत समिती अंतर्गत ९६ ग्रामपंचायतीसाठी २७ हजार १८0 वृक्ष येणार आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यापासून तर संगोपनापर्यंत मजुरामार्फत काम केले जातात. ग्रामपंचायती गटवृक्ष लागवड, स्मशानभुमी, पडीक रस्ते, पांदण रस्ते आदी ठिकाणी वृक्षारोपण करतात.
शासनाची वृक्षारोपण मोहीम मात्र काही ठिकाणी कागदोपत्रीच दिसून येते. केवळ लाखो रूपये खर्च करून रोपे खरेदी केली जातात. मात्र त्यांची पाहिजे तशी देखरेख ठेवली जात नसल्याने जिवंत रोपटी जळून वाळले असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे शासनाची योजना राबवायची म्हणून नावालाच सुरू आहे. ग्रामपंचायतींनी वृक्ष लावण्याबरोबर जगविण्याची जबाबदारी स्विकारण्यात वृक्ष लागवड योजना सफल होवू शकेल, एवढे मात्र निश्‍चित.
सामाजिक वनीकरणाची झाडे देखणी
खामगाव सामाजिक वनीकरण परिक्षेत्राअंतर्गत गतवर्षी ३८ हजार वृक्षाचे वाटप झाले. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या वृक्षाच्या संरक्षणासाठी तारेची जाळी, वेळोवेळी पाणी, खत फवारणी करून झाडे हिरवीगार दिसुन येतात. बोरी अडगाव ते आंबेटाकळी रस्त्यावरील झाडे रस्त्याने जा-ये करणार्‍या नागरीकांचे लक्ष वेधून घेतात.


** रोहयोजनेची मजुरी ६ रूपयाने वाढली
राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यापासून तर संगोपनाची जबाबदारी मजुरामार्फत केली जाते. आतापर्यंत या मजुराला दिवसापोटी १६२ रूपये मजुरी मिळत होती. मात्र यावर्षी यामध्ये ६ रूपयांनी वाढ करून मजुरीचा दर १६८ रूपये झाला आहे. झालेल्या कामाचे मस्टर भरल्यानंतर मजुरांना मजुरी मिळते. परंतु मस्टर वेळेवर भरले जात नसल्याने मजुरांचा पगार वेळेवर होत नसल्याची ओरड आहे.

** नगर पालिका नियोजन करेल काय?
खामगाव नगर पालिकेने गतवर्षी २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवले होते. याकरीता सामाजिक वनीकरणाकडे झाडेही मागितली होती. मात्र नगर पालिकेत झाडे लावण्याबाबत ठराव मंजुर होवू शकला नाही. वृक्ष लागवडीची आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण न झाल्याने वृक्षारोपणाचा बोजवारा उडाला. २१ लाखाचे अंदाजपत्रक तयार होवूनही फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात तरी खामगावला क्लिन सिटी ग्रीन सिटी करण्यासाठी वृक्षारोपणाचे नियोजन नगर पालिका करेल काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.