शूरवीरांच्या आगमनाने बुलडाणेकर भारावले

By Admin | Updated: July 17, 2015 02:02 IST2015-07-17T02:02:27+5:302015-07-17T02:02:27+5:30

बुलडाणा शहरातून निघाली भव्य शोभायात्रा ; मान्यवरांनी कथन केले स्वानुभव.

The adventures of the heroes filled with bulge | शूरवीरांच्या आगमनाने बुलडाणेकर भारावले

शूरवीरांच्या आगमनाने बुलडाणेकर भारावले

बुलडाणा : कारगील युद्ध व सियाचिन आतंकवादी विरोधी कारवाईत अतुलनिय कामगीरीबद्दल भारत सरकारने सन्मानित केलेल्या ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन गुरूवारी येथील गांधी भवन व सहकार विद्या मंदिरात करण्यात आले होते. नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील यांनी परमवीरचक्रधारकांचा सत्कार केला. तत्पूर्वी ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांनी हुतात्मा सिद्धेश्‍वर गोरे स्मारकावर व जयस्तंभावर पुष्पचक्र वाहिले. स्मारक परिसरात त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जयस्तंभापासून सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. बुलेटस्वार युवकांच्या रॅलीने पाहुणे सहकार विद्या मंदिरापयर्ंत पोहोचले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांनी आपले रोमांचक अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविसकर, मुख्यकार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, टी. डी. अंभोरे, राधेश्याम चांडक मंच्यावर उपस्थित होते. प्रास्ताविक कर्नल सुहास जतकर यांनी केले. संचालन जिल्हा सैनिक अधिकारी मिलिंदकुमार बडगे यांनी केले. कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The adventures of the heroes filled with bulge