शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात पकडला ‘त्या’ खुनाचा आरोपी

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

देऊळगावराजा येथील खूनप्रकरण; आरोपीस पोलिस कोठडी.

देऊळगावराजा (बुलडाणा): ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये स्वत:च्या मित्राला कायमस्वरुपी नोकरी मिळाल्याचा वचपा काढत अतिशय निर्दयीपणे मित्राचा खून केल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी घडल्यानंतर अवघ्या एका दिवसात देऊळगावराजा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.चिखली तालुक्यातील वैरागड येथील आरोपी अंकुश नवनाथ बांगर हा २५ वर्षीय तरुण पुणे येथील संगम ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता. पाच ते सहा महिन्याअगोदर त्याच्या गावाशेजारील टाकरखेड हेलगा येथील अमोल मुरलीधर कदम (२५) याला त्याने आपल्या सोबत काम करण्यासाठी या कंपनीमध्ये पुण्याला घेऊन गेला; मात्र आरोपी अंकुश हा कामावर वेळोवेळी गैरहजर राहत असल्याने कंपनीने त्याला कामावरुन कमी करुन त्याचा मित्र अमोल कदम यास कंपनीने कामास ठेवले. याच गोष्टीचा राग अंकुशला आल्याने वचपा काढण्यासाठी देऊळगावराजा बायपासवर खंडोबा टेकडीनजीक निर्जनस्थळी गाडी थांबवून झोपलेल्या अमोलच्या डोक्यामध्ये लोखंडी टामीने प्रहार करुन त्यास खाली ओढून रस्त्यावर टाकून वाहनाचे चाक निर्दयीपणे दोन ते तीन वेळा फिरवून त्यास ठार केले. हा अपघात वाटावा व कुणाला शंका येऊ नये म्हणून अमोलच्या अंगावरचे कपडे काढले. ३0 नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस ये ताच ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी जि.पो.अ.श्यामराव दिघावकर व एस.डी.पी.ओ.प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाचे फोटो सर्व ठिकाणी पाठविले व आपले शोधपथक रवाना केले. अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा तपास लावला. याकामी शे.जाफर, पंजाब साखरे, वाहनचालक मुळे यांनी परिङ्म्रम घेतले. आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.