शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना गुन्हे अन्वेषणांत श्वान पथकाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST

बुलडाणा : क्लिष्ट आणि तेवढ्याच आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करताना कधी-कधी पोलिसांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागते; मात्र याच आव्हानात्मक ...

बुलडाणा : क्लिष्ट आणि तेवढ्याच आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करताना कधी-कधी पोलिसांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागते; मात्र याच आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत मिळते ती श्वान पथकाची. बुलडाणा पोलीस विभागातील श्वान पथकाने आतापर्यंत पोलिसांना शंभरहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली आहे.

गुन्हेगार गुन्हा करून जातो; मात्र कधी-कधी कुठलाही पुरावा नसल्याने त्या गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना अडचणी येतात; मात्र ही अडचण समजूनच श्वान पथकातील गुन्हे अन्वेषण करणारे श्वान त्या गुन्हेगारांच्या पावलांचा माग घेऊन अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत करतात. त्याचप्रमाणे बुलडाणा पोलीस विभागातील श्वान पथक गुन्हे उघड करण्यात पोलीस विभागाला मोलाची साथ देत असून, या विभागातील चार श्वानांनी आतापर्यंत शंभरहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस विभागाला मदत केली आहे. पथकातील राजा, राणी, एंजल आणि जुली ही चारही श्वान सध्या कार्यरत असून, पुढील काही वर्षे हे चारही श्वान निवृत्तीपर्यंत पोलिसांची मदत करण्यासाठी सज्ज आहेत. चारही श्वानांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

--राजा-राणीचे पुण्यात, तर जुलीचे हरियाणात प्रशिक्षण--

बुलडाणा पोलीस विभागाच्या श्वान पथकात एकूण चार श्वान आहेत. राजा, राणी, जुली आणि एंजल अशी या श्वानांची नावे असून, राजा आणि राणीचे पुणे गुन्हे अन्वेशन विभाग श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे येथे प्रशिक्षण झाले आहे, तर जुलीचे आयटीबीपी मानू पंचफुला हरियाणा येथे प्रशिक्षण झाले आहे. तर एंजलचे एसएसबी डेरा अलवर, राजस्थान येथे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या श्वानांनी शंभरपेक्षा अधिक गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मदत केली आहे. यातील श्वान एंजलची महाराष्ट्र कर्तव्य मेळाव्यात निवड झाली होती; मात्र कोरोनामुळे हा मेळावा होऊ शकला नाही.

--राजा बॉम्ब तर राणी ,जुली गुन्हे शोधक--

श्वान पथकातील राजा हा श्वान बॉम्ब शोधक आहे. तर राणी आणि जुली हे दोन श्वान गुन्हे शोधक आहेत. एंजल अमली पदार्थ शोधक आहे. जुली या श्वानाने चालू वर्षातील तीन महत्त्वाचे गुन्हे उघड करण्यात मदत केली आहे.

----

पोलिसांच्या मागणीनुसार आणि पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी श्वान पथक काम करीत आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत श्वान पथकाने दमदार कामगिरी केली आहे.

(संजय वाढई, पोलीस उपनिरीक्षक, श्वान पथकप्रमुख)