टाकरखेड वायाळ येथे अतिसाराचे ८७ रुग्ण

By Admin | Updated: May 1, 2017 01:09 IST2017-05-01T01:09:21+5:302017-05-01T01:09:21+5:30

देऊळगाव राजा : डिग्रस बु. येथे गत चार दिवसांपासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले असताना, तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथे ३० एप्रिल रोजी अतिसाराने ८७ रुग्ण ग्रस्त झाले.

87 patients of diarrhea at Tarkkhed Vayal | टाकरखेड वायाळ येथे अतिसाराचे ८७ रुग्ण

टाकरखेड वायाळ येथे अतिसाराचे ८७ रुग्ण

देऊळगाव राजा : डिग्रस बु. येथे गत चार दिवसांपासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले असताना, तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथे ३० एप्रिल रोजी अतिसाराने ८७ रुग्ण ग्रस्त झाले. दरम्यान, जि.प.सदस्य शीलाताई शिंपणे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी टाकरखेड वायाळ गावात दाखल झाले. दूषित पाण्यामुळे पोटात मुरडा, अतिसारासह उलटी झाल्याने टाकरखेड वायाळ गावातील तब्बल ८७ रुग्णांना साथ रोगाने ग्रासले. याबाबतची माहिती जि.प.सदस्य शीलाताई शिंपणे, धनशीराम शिंपणे यांना मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी किशोर गीते यांना सदर प्रकाराचे गांभीर्य सांगून लगेच टाकरखेड वायाळ येथे बोलावून घेतले. यानंतर गीते यांच्यासह आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली व त्यांनी साथ रोगाने त्रस्त ८७ रुग्णांवर उपचार केले. आरोग्य विभागामार्फत सायंकाळपर्यंत उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून, साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डिग्रस बु. गावात अतिसाराचे रुग्ण लक्षात येताच मी स्वत: त्याठिकाणी तत्काळ गेलो. डॉ.किशोर गीते, डॉ.अमोल दहिफळे यांनी रुग्णांवर उपचार केले. सध्या स्थिती नियंत्रणात असून, आरोग्य विभाग जातीने लक्ष ठेवून आहे. गावातील नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी टाळण्याचे आवाहन केले असून, रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे.
- डॉ. दत्ता मान्टे, तालुका आरोग्य अधिकारी दे.राजा.

Web Title: 87 patients of diarrhea at Tarkkhed Vayal