शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

६२ खाणपट्ट्यांची ईटीएस मशीनद्वारे होणार मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 11:08 IST

Buldhana News : रेती घाटावर अवैध उत्खनन करण्यासोबतच गैरप्रकार करणाऱ्यांना एक प्रकारे चाप बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची आता वर्षातून किमान एकदा ईटीएस (इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन) द्वारे मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रेती घाटावर अवैध उत्खनन करण्यासोबतच गैरप्रकार करणाऱ्यांना एक प्रकारे चाप बसणार आहे. यासोबतच रेती घाट तथा खाणपट्ट्यांबाबत आलेल्या तक्रारींची सत्यताही यामुळे समोर येऊ शकेल. जिल्हाधिका-यांनी यासंदर्भाने अनुषंगिक आदेश दिलेले आहेत.ईटीएस मशीन या प्रामुख्याने जमिनीच मोजणी करण्यासाठी वापरण्यात येतात. त्याचा उपयोग आता खाणपट्ट्यातही जिल्हा प्रशासन करणार आहे. शासनाने २०१९ मध्ये एका शासन निर्णयाद्वारे खाणपट्ट्यांच्या लिलावांची कार्यपद्धती  निश्चित केली आहे. त्यात नंतर काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. परंतु खाणपट्ट्यातून गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक व मंजुरीपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याच्या तक्रारी शासन व प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत होत्या. सोबतच अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूलही बुडत होता. सोबतच काहींनी तर नुसत्या तक्रारीच करण्यास प्राधान्य दिले होते. त्यामुळे ईटीएस मशीनद्वारे खाणपट्ट्यांची मोजणी करणे शक्य होऊन अशा प्रकारांना आळा बसेल व वस्तुनिष्ठ माहिती ही खणीकर्म विभागाकडे उपलब्ध होईल. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील सर्वच खाणपट्ट्यांची ईटीस मशीनद्वारे वर्षातून किमान एकदा मोजणी  करण्याचा आदेश दिला आहे.मोजणीअंती  परवानाधारक व खणीपट्टाधारकाने मंजुरीपेक्षा जास्त खोल किंवा अतिरिक्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास येऊ शकते. असे आढळून आल्यास संबंधिताला जास्तीची रॉयल्टी ३० दिवसात भरावी लागणार आहे. दरम्यान, संबंधितांनी वेळेत ही रायल्टी न भरल्यास त्याला दंड ठोठावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यासोबतच दंड न भरणाऱ्यास वाहतूक पासही देण्यात येणार नाही, अशी भूमिकाच जिल्हा प्रशासनाने आता घेतली आहे. संबंधित आदेशाची जिल्ह्यात तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले असल्याचे खणीकर्म विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा