शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा कोविड रुग्णालयात २४ तासांत ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:32 IST

coronavirus news गेल्या २४ तासांत बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांत बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, गंभीर अवस्थेत कोविड रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, दोघांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. एका मृतकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.      जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या तूर्तास २०६ दाखविण्यात आली असली, तरी डेथ ऑडिट समिती गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूसंदर्भात समीक्षा करून नेमका आकडा काय निश्चित करते, याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे; मात्र कोविड समर्पित रुग्णालयात २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोविड संसर्गाबाबत जनसामान्यांनी आता अधिक खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.यासंदर्भात कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, एकाचा अहवाल निगेटिव्ह होता तर अन्य दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मृत व्यक्तींचे वय हे ६० वर्षांवरील असून, दुर्धर आजार असणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे. या मृत्यूंनंतर डेथ ऑडिट कमिटीचीही बैठक झाली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यात नेमकी कोणती भूमिका घेण्यात आली? ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांमध्ये बहुतांश जण हे दुर्धर आजाराने ग्रस्त होते, असेही आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या