शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बुलडाणा जिल्ह्यात ४७८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 2:16 PM

शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने तब्बल ४७८ कोटी रुपयांचे खरीपाचे नुकसान केले असून सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे आता पूर्णत्वास गेले असून शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.दरम्यान, प्रसंगी या नुकसानामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडणारा परतीचा आणि अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक खराब झाले तर शेतात लावून ठेवलेल्या पिकाच्या सुड्या या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. एकट्या मेहकर परिसरातील दीडशेपेक्षा अधिक सुड्या पैनगंगा नदीत वाहून गेल्या होत्या. लोणार तालुक्यातही जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान सुड्या वाहून गेल्यामुळे झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४५० कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून १३ ही तालुक्यात १४२० गावात नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले होते. या पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती फार मोठी होती. प्रत्यक्ष बांधावर जावून हे नुकसान पाहणाºया कारेगाव येथील एका शेतकरी महिलेचा शेतातच मृत्यू झाल्याची ह्रदय द्रावक घटना घडली होती. एकंदरीत या नुकसानामुळे शेतकरी पुरता हादरून गेला होता.जवळपास १५ दिवस अख्खा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानाची पाहणी करत होता. त्याचा अंतिम अहवाल आता पूर्णत्वास गेला असून बुधवारी किंवा गुरूवारी तो विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्यशासनास हा अहवाल जाईल तेथून केंद्राकडे राज्याचा अहवाल जावून केंद्राचे पथकही जिल्ह्यात पाहणीस येईल. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल. यासाठी किती काळ लागले हे तुर्तास सांगता येणार नाही. मात्र १५ डिसेंबरच्या आसपास त्यादृष्टीने प्रत्यक्ष हालचाली होवू शकतात, असा अंदाज आहे. अशी असेल नुकसान भरपाईयामध्ये प्रामुख्याने जिरायती क्षेत्रासाठी सहा हजार ८०० रुपये प्रतीहेक्टरप्रमाणे तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतीहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंदर्भाती स्थायी आदेश व २०१५ अनुषंगीक विषयान्वये करण्यात आलेल्या काही बदलांचा विचार करून ढोबळमानाने शेतकºयांना नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रप्रती राजवट पाहता प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात नेमकी कधी ही नुकसानाची रक्कम पडेल हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी