बुलडाण्यात ४० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:41 IST2021-09-04T04:41:18+5:302021-09-04T04:41:18+5:30

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ...

40 kg cannabis seized in bulldozer | बुलडाण्यात ४० किलो गांजा जप्त

बुलडाण्यात ४० किलो गांजा जप्त

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या एका पिशवीत गांजा आढळून आला. त्याला याबाबत विचारले असता त्याने तो गुजरात राज्यातील बिल्ली मोरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्याकडील गांजाचे वजन केले असता त्याचे वजन ४० किलो (२ लाख ८१ हजार ७०० रुपये) भरले. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, लक्ष्मण कटक, हवालदार महादेव इंगळे यांनी केली.

नवी मुंबईला जाण्याचा होता बेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गुजरात राज्यातील असून, तो गांजा घेऊन नवी मुंबईला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, हा गांजा स्थानिक जिल्ह्यातून त्याने घेतला होता की, परराज्यातून आणून तो मुंबईला घेऊन जात होता?, हे पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.

Web Title: 40 kg cannabis seized in bulldozer