शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात ७१ अपघात महामार्गावर ३५ व्यक्तींचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मागील पाच महिन्यात ७१ अपघात झाले आहेत. यामध्ये ३५ जणांचा मृत्यू तर ७४ जण गंभीररीत्या जखमी झाले.

खामगाव : शहराजवळून जाणार्‍या मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मागील पाच महिन्यात ७१ अपघात झाले आहेत. यामध्ये ३५ जणांचा मृत्यू तर ७४ जण गंभीररीत्या जखमी झाले. २८ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
खामगाव उपविभागामध्ये असलेल्या महामार्गात खामगाव ते अकोला रस्ता असून, खामगाव ते शेगाव हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरती अपघाताची मालिकाच सुरु आहे. प्रत्येक दिवशी अपघात झाल्याची माहिती मिळते. यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या रस्त्यावरील अपघातासाठी वाहनचालकांच्या चुका, वाहनांची दुरवस्था, रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे, महामार्गावर बिनदिक्कतपणे धावणारे ट्रॅक्टर, ऑटोरिक्षा व इतर तत्सम वाहने, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने, सहज उपलब्ध होणारे वाहन चालक परवाने, रस्त्यांवर आवश्यक त्या चिन्हांचा अभाव, रस्ता सुरक्षिततेचा अभाव महामार्गावर असलेले अपघाती वळणे, रस्त्यावरील खड्डे, अनेक ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत; मात्र त्या ठिकाणी पांढरे पट्टे किंवा सूचना फलक लावलेले नाहीत, यामुळेही अपघात वाढत आहेत.
शासनाने विविध कायदे करुन अपघात रोखण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र तरीदेखील हे अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत. दररोज वाढणारी वाहनांची संख्या चिंतेचा विषय बनत आहे. महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच यंत्रणा आपल्याकडे नाही. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त करणे शक्य नाही. स्वत: वाहनचालकानेच काळजी घेण्याची गरज आहे. भरघाव वेगाने जाणार्‍या वाहनांवर वेळोवेळी दंडही केला जातो. अनेक व्यक्ती कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. अपघात कितीही मोठा असला तरी त्यामध्ये लगेच जामीन मिळत असल्यामुळे त्याकडे गंभीरपणे पाहायला कोणीच तयार नाही.

** भरधाव वेगाने वाहन चालवणे, या कारणामुळे अनेक अपघात होऊन काही जण आपला जीव गमवतात तर काही जण कायमचे जायबंदी होत आहेत.

** शासनाने विविध कायदे करुन अपघात रोखण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र तरीदेखील हे अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत.

** रस्त्यांवर आवश्यक त्या चिन्हांचा अभाव, रस्ता सुरक्षिततेचा अभाव महामार्गावर असलेले अपघाती वळणे, रस्त्यावरील खड्डे, अनेक ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत; मात्र त्या ठिकाणी पांढरे पट्टे, वा सूचना फलक लावलेले नाहीत, यामुळेही अपघात वाढत आहेत.