शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा नगरपंचायतीसाठी २१ नामांकन दाखल

By admin | Updated: October 7, 2015 23:27 IST

राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्यामुळे नामांकनाची प्रक्रिया संथ; गुरूवार ८ ऑक्टोबर नामांकनाचा शेवटचा दिवस.

मोताळा ( जि. बुलडाणा) : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मोताळा नगरपंचायतीत बुधवारी २१ जणांनी नामांकन दाखल केले आहे. तर काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्यामुळे नामांकनाची प्रक्रिया रखडली असल्याचे ७ ऑक्टोबर रोजी दिसून आले; मात्र गुरूवार ८ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने या एक दिवसात या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मोताळा नगरपंचायतमध्ये १७ प्रभागासाठी आतापर्यंत २२६ नामांकन अर्जाची विक्री झाली आहे. बुधवारी नगरपंचायत निवडणुकीसाठी २१ जणांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक ४, ८, १३ व १४ मधून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. प्रभाग क्रमांक १, २, ३, ५, ६, ७, ११, १५ व १७ मधून प्रत्येकी १ अर्ज दाखल झाला आहे. तर प्रभाग क्रमांक ९ मधून ४, प्रभाग क्रमांक १0 मधून ३, प्रभाग क्रमांक १२ मधून २, प्रभाग क्रमांक १६ मधून ३ असे एकूण २१ नामांकन दाखल झाले आहेत. *उमेदवारीअभावी नामांकनाची प्रक्रिया रखडली मोताळय़ात राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्यामुळे नामांकनाची प्रक्रिया रखडल्याचे दिसून आले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा गुरूवार हा शेवटचा दिवस असून, उरलेल्या एक दिवसात राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गर्दी निश्‍चितच वाढणार आहे. मोताळय़ात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, भाजप आणि सेना या चार प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. या प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास नाराज कार्यकर्ते दुसर्‍या पक्षातून उमेदवारी मिळवून आव्हान उभे करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.