शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १४३ कत्तलखाने बंदचे आदेश

By admin | Updated: March 27, 2015 01:39 IST

शेगाव व खामगाव येथील कत्तलखान्यांचा समावेश.

शेगाव(जि. बुलडाणा) : सरकारचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृतरित्या चालविण्यात येणारे राज्यातील १४३ कत्तलखान्यांसोबतच शेगाव व खामगाव येथील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने घेतला आहे. यामध्ये शेगाव शहरातील दोन्ही कत्तलखान्यांचा समावेश असून, बुधवारपासून नगरपालिकेने सदर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. राज्यात बंद करण्यात येत असलेल्या कत्तलखान्यांमध्ये १२८ लहान आणि १६ मोठे कत्तलखाने आहेत. दिलेल्या र्मयादेहून अधिक प्रमाणात या कारखान्यांकडून जनावरांची कत्तल केल्या जात असल्याचे उघड झाले. तसेच कत्तलखान्यांच्या परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच सॉलिड वेस्टची व्यवस्था करण्याची सक्ती कत्तलखाने चालवणार्‍यांवर असताना ही यंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे १६ मोठय़ा कत्तलखान्यांना तत्काळ कुलूप ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शेगाव व खामगाव शहराचा समावेश आहे. या बेकायदा कृत्याची दखल घेत हे कत्तलखाने बंद करण्याचे आदेश संबंधित पालिका मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने २५ मार्च रोजी शेगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी टी.जी. मुल्लाणी यांनी शहरातील दोन्ही कत्तलखान्यांना नोटीस बजावल्या असून, या ठिकाणी कुठल्याही जनावरांची कत्तल झाल्यास पोलीस कारवाईचा इशारा देण्यात आलेल्या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. पर्यावरण कायद्याचे कलम १५ आणि मुंबई पालिका प्रांतिक अधिनियम ३९४ नुसार कत्तलखान्यांविरोधी कारवाई करण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार १ लाख रुपयांचा दंड आणि पाच वर्षांची सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयातील लक्ष्मी नरेन मोदी विरुद्ध केंद्र सरकार या सुनावणीच्या १६ मार्च २0१४ च्या निर्णयाचा आधार घेत ही कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यामध्ये समावेश असलेल्या इतर कत्तलखाने चालकांनासुद्धा नोटीस बजावण्यात येणार आहे.