शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १४ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

नव्या सरकारवर शेतकरी आत्महत्यांचे सावट : हवालदिल शेतक-यांना हवा आधार.

बुलडाणा : सुगीचा हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्‍यांच्या घरात शेतीमालाचे उत्पन्न येते, खरिपाच्या हंगामात लावलेला पैसा शेतमाल विकुन हिशेब जुळविला जातो. यावर्षी मात्र खरिपाचा हंगाम पुर ता हातातून गेल्यामुळे सुगीचा हंगाम हा शेतकर्‍यांसाठी आत्महत्येचा हंगाम ठरला आहे. १ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत तब्बल १४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. २८ ते २९ नोव्हेंबरच्या ४८ तासात तब्बल ५ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे समोर आले आहे.२८ नोव्हेंबरपासून पुढील ४८ तासातच पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण गावंडे, २९ नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील देऊळघाटचे विष्णू वानखडे, शेगाव तालुक्यातील जवळा येथील शिवाजी जवळकार, लोणार तालुक्यातील गंधारी येथील गुलाब रामसिंग जाधव, तर ३0 नोव्हेंबर रोजी चिखली तालुक्यातील पांढरदेवचे पांडुरंग चवरे यांचा समावेश आहे. काल २ डिसेंबर रोजी जवळा येथीलच गणेश मुरलीधर कान्हेरकर (वय ३२) या शेतकरी पुत्राने सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गुरांच्या गोठय़ात विष प्राशन केले. जिल्ह्यात मागील १४ वर्षात १ हजार ५९९ शेतकर्‍यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्या. त्यापैकी शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या ६१0 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली, तर ९६८ शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना विविध कारणान्वये मदत नाकारण्यात आली. या आत्महत्यामध्ये आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडणो आदी कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. यावर्षी खरि पामध्ये उशिरा आलेला पाऊस व परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.