शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: October 29, 2014 00:17 IST

मलकापूर शहरवासीयांची पाणी समस्या कायमच.

हनुमान जगताप / मलकापूरगेल्या अनेक वर्षांपासून मलकापूरची पाणी समस्या कायम ती कायमच आहे. अशात पाऊण लाख नागरिकांना पालिका अखत्यारीतील १३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार योजना कागदोपत्री औपचारिकतेत गुंतली आहे. परिणामी, त्या कामास गती यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर नगरीचे सुमारे पाऊण लाख नागरिक गेली अनेक वर्षांपासून पाणी समस्येने हैराण आहेत.मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. त्यामुळे शहरातील सुमारे पाऊण लाख नागरिकांना सदर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्याची प्रतीक्षा लागली आहे. कारण दुसरीकडे शहरातील पाणी पुरवठय़ाची अवस्था जैसे थे आहे. दरम्यान निवडणुका झाल्या. आचारसंहिता संपली. त्यामुळे मलकापूरसाठीच्या त्या योजनेची धडाक्यात सुरुवात व्हावी, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आता पुढे येवू लागली आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुजल पाणीपुरवठा योजनेतून पक्ष नेत्यांच्या पाठपुराव्यातून नगरासाठी १३ कोटींची योजना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली. त्यामुळे लवकरच त्या योजनेचे काम सुरू होणार असल्याचे मलकापूर नगराध्यक्ष मंगलाताई पाटील यांनी सांगीतले. *पंधरा दिवसाआड पाणीशहरात ८ ते १0 दिवसाआड तर अनेक भागात १५ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. यामुळे नागरिकांना पाणीसाठवण कशी करावी, असा प्रश्न पडतो. तर निश्‍चित वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भटकंती करावी लागते. नाइलाजाने अनेकवेळा दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.