शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनाच्या धडकेत १ ठार

By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST

महेकर तालुक्यातील चिंचोली फाटयाजवळल अपघातात एक ठार.

मेहकर : भरधाव वेगात जाणार्‍या कमांडर जीपने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन जणांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचोली बोरे फाट्यानजीक घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मेहकरवरुन सुलतानपूर कडे एम.एच.१२ ए.एफ. २६१ क्रमांकाची कमांडर जीप भरधाव वेगात जात होती. दरम्यान पळसखेड येथील अनिल दगडू ताकतोडे व सुरेश केरुबा ताटेकर आपली एम.एच.२८ ए.सी.७९५८ क्रमांकाची मोटारसायकल सारंगपूर रस्त्यावर एका बाजुला लावून उभे होते. अशातच कमांडर जीपने भरधाव वेगात येऊन त्यांना धडक दिली. त्यात दोघेही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन बुलडाणा येथे हलविण्यात आले. त्यामध्ये अनिल दगडू ताकतोडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. यासंदर्भात नायगाव दत्तापूर येथील आनंदा ताकतोडे यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. या परिसरातील रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे.