शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

भंडारा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे विराजमान आहेत. अवघ्या सात महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मंगळवारी मुंबई येथे अध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देइच्छुकांची मोर्चेबांधणी : जिल्ह्यातील अनेकांच्या आशा पल्लवित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवघ्या सात महिन्यांवर निवडणूक असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली असून भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. तब्बल ११ वर्षानंतर अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गाला मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.भंडारा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे विराजमान आहेत. अवघ्या सात महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मंगळवारी मुंबई येथे अध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यात भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला तशी ही सुरुवात झाली होती. परंतु आता खुल्या संवर्गासाठी अध्यक्षपद असल्याने स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. अनेकजण अध्यक्षपदासाठी इच्छुक असून जिल्हा परिषद लढविण्याची तयारी चालविली आहे.सध्या भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस २०, राष्ट्रवादी १५, भाजप १२, शिवसेना १ आणि अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे असून उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन सभापती पद आहेत. सात महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना मोर्चेबांधणी करीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि अपक्षाने बाजी मारली.विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमुक्त झाला आहे. अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चारही पक्ष मोठ्या ताकतीने उतरणार आहे. राज्याच्या सत्ता समीकरणात काँग्रेस आणि राष्टÑवादी एकत्र असून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आहे. त्याचा परिणामही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसणार आहे.११ वर्षानंतर खुला संवर्गभंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तब्बल ११ वर्षानंतर खुल्या संवर्गासाठी जाहीर झाले आहे. २००३ ते २००८ या काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. त्यानंतर २००८ ते २०१० पर्यंत अनुसूचित जाती, २०१० ते २०१३ नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) २०१३ ते २०१५ सर्वसाधारण महिला, २०१५ ते २०१८ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला आणि २०१८ ते २०२० पर्यंत अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. आता तब्बल अकरा वर्षानंतर खुल्या संवर्गासाठी अध्यक्षपद जाहिर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद