साखळीत दुचाकीस्वार तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:34+5:30

खुशबू रतनलाल पारधी (२३) रा. चिचोली असे मृत तरुणीचे नाव आहे. तर विद्वेश्वरी भारत ठाकूर (२८) रा. बघेडा ही बहिण तर रेखा पारधी या वहिणी गंभीर जखमी झाल्या. तंत्रनिकेतनचे शिक्षण घेतलेली खुशबू बहिण आणि वहिनीसोबत दुचाकीक्रमांक एम एच ४९ ए ८३५५ ने तुमसरवरुन चिचोलीकडे जात होत्या. साखळी गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात खूशबू ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली.

A young woman riding a two-wheeler in a Sakhali was killed | साखळीत दुचाकीस्वार तरुणी ठार

साखळीत दुचाकीस्वार तरुणी ठार

ठळक मुद्देट्रकने चिरडले : बहिण व वहिनी गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : भरधाव ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार तरुणी जागीच ठार तर तिची बहिण व वहिनी गंभीर जखमी झाल्या. ही घटना तुमसर तालुक्यातील साखळी येथे गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
खुशबू रतनलाल पारधी (२३) रा. चिचोली असे मृत तरुणीचे नाव आहे. तर विद्वेश्वरी भारत ठाकूर (२८) रा. बघेडा ही बहिण तर रेखा पारधी या वहिणी गंभीर जखमी झाल्या. तंत्रनिकेतनचे शिक्षण घेतलेली खुशबू बहिण आणि वहिनीसोबत दुचाकीक्रमांक एम एच ४९ ए ८३५५ ने तुमसरवरुन चिचोलीकडे जात होत्या. साखळी गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात खूशबू ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. दूचाकीचाही चुराडा झाला. जखमींना तुमसर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: A young woman riding a two-wheeler in a Sakhali was killed