वैनगंगा नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:44+5:30

सचिन दिनकर पडोळे (२२) रा. सिल्ली ता. भंडारा असे मृताचे नाव आहे. मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी तो सायंकाळी आपल्या मोठ्या भावाची दुचाकी घेवून आंबाडी येथे जात असल्याचे सांगितले. मात्र तेव्हापासून तो घरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता पुलावर दुचाकी आढळून आली. सचिनने काही बरेवाईट तर केले नाही ना? अशी शंका आली. पोलिसांच्या मदतीने शोध सुरु झाला.

Young boy commits suicide by jumping into the Wainganga River | वैनगंगा नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

वैनगंगा नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

ठळक मुद्देकारधाची घटना : तीन दिवसानंतर उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाने वैनगंगा नदीच्या कारधा येथील लहान पुलावरुन एका उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
सचिन दिनकर पडोळे (२२) रा. सिल्ली ता. भंडारा असे मृताचे नाव आहे. मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी तो सायंकाळी आपल्या मोठ्या भावाची दुचाकी घेवून आंबाडी येथे जात असल्याचे सांगितले. मात्र तेव्हापासून तो घरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता पुलावर दुचाकी आढळून आली. सचिनने काही बरेवाईट तर केले नाही ना? अशी शंका आली. पोलिसांच्या मदतीने शोध सुरु झाला. ढिवर बांधवांच्या मदतीने वैनगंगेच्या पात्रात दोन दिवस शोध घेण्यात आला. परंतु थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान गुरुवारी सकाळी सालेबर्डी परिसरात वैनगंगा नदीपात्रात सचिनचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान सायंकाळी सिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Young boy commits suicide by jumping into the Wainganga River

टॅग्स :Deathमृत्यू