शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:00 AM

यंदा आरटीई अंतर्गत राज्य पातळीवर विद्यार्थ्यांची निवड यादी  जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ६८३ विद्यार्थ्यांची नावे वेटिंग लिस्ट अंतर्गत आहे. नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात ९४ शाळा : आजपासून आरटीई प्रवेशाला होणार प्रारंभ

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आरटी दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव करण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर ११ जून म्हणजे शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र गतवर्षी कोरोनामुळे अभ्यासाविना गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष असेच गेले. या वर्षीही तशीच परिस्थिती राहणार काय, असा सवाल व चर्चा पालकांमध्ये हाेत आहे.यंदा आरटीई अंतर्गत राज्य पातळीवर विद्यार्थ्यांची निवड यादी  जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ६८३ विद्यार्थ्यांची नावे वेटिंग लिस्ट अंतर्गत आहे. नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे. प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने २,०५१ अर्ज प्राप्त झाले होते. आता ११ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यात गतवर्षीप्रमाणे गरीब विद्यार्थी अभ्यासाविना तर राहणार नाही ना अशी चर्चा होत आहे.

गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत

 जिल्हा पातळीवर आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश दिला जाईल, यात कुठलीही शंका नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर म्हणाले, गरीब विद्यार्थ्यांजवळ  अभ्यासासाठी कुठलेही साधने उपलब्ध नसतात. डिजिटल शिक्षणाबाबत तर ते कोसो दूर असतात. अशावेळी शिक्षण विभागामार्फत त्यांना साधनेही उपलब्ध करून द्यायला हवीत. मात्र तसे कधीच झालेले नाही. गरिबांसाठी राज्य शासनाने आरटीई ॲक्ट आणला, ही चांगली बाब आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी काळाची गरज आहे. कोरोना महामारी तर ही अत्यंत निकषपूर्ण बाब आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या पाल्यांना तंत्रयुक्त शिक्षण देण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आधीच शासनाकरवी शाळांना आरटीईची रक्कम मिळालेली नाही.

आरटीई अंतर्गत यावर्षी प्रवेशासाठी ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भंडारा तालुक्यात २३७, लाखांदूर १९, लाखनी ७१,  मोहाडी ११८, पवनी ७७, साकोली ८६ तर तुमसर तालुक्यातील १७६ विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. सदर प्रवेश भंडारा तालुक्यातील २७, लाखांदूर ४, लाखनी ९, मोहाडी १६, पवनी १२, साकोली १० तसेच तुमसर तालुक्यातील १६ शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

पालक म्हणतात, वर्ष वाया गेले !

राज्य शासनाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले. आरटीईअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांचे वर्ष वाया गेले, असेच म्हणावे लागेल. यावर्षी तरी असे व्हायला नको.- विनोद रामटेके, लाखांदूर 

ऑनलाइन पद्धतीने माझ्या पाल्याचा प्रवेश केला होता. मात्र कोरोनामुळे शाळाच भरली नाही. आता पुन्हा यावर्षीही तशीच स्थिती राहणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे शासनाने साधने उपलब्ध करून द्यायला हवीत.- ममता कारेमोरे, भंडारा 

यावर्षी माझ्या पाल्याच्या प्रवेश आरटी अंतर्गत करणार आहे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे शाळाच उघडली नाही. या सत्रात तरी शाळा उघडेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. शासनाने यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे.- सचिन शेंडे, साकोली

 

टॅग्स :Educationशिक्षण