कोरोनाच्या सावटात मजुरांचा ३५० किमी सायकलने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:47+5:30

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत होती. ही बाब त्यांनी आपले ठेकेदार हेमंत शृंगारपवार यांना सांगितली. त्यांनी येथेच रहा सर्व व्यवस्था होईल, असे सांगितले.

 Workers travel 350 km cycle in the shadow of Corona | कोरोनाच्या सावटात मजुरांचा ३५० किमी सायकलने प्रवास

कोरोनाच्या सावटात मजुरांचा ३५० किमी सायकलने प्रवास

Next
ठळक मुद्देअड्याळहून निघाले मध्य प्रदेशाकडे । ठेकेदाराने दिल्या सायकली उपलब्ध करून

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पोटाची खडगी भरण्यासाठी ते अड्याळमध्ये आले. गेल्या कित्येक महिन्यापासून गावात राहू लागले. गावकऱ्यांशी लडा लागला. मात्र कोरोनाच्या धास्तीने घर कुटुंबाची आठवण सतावू लागली. गावी जाण्याचा कोणताच मार्ग नाही. अशा स्थितीत ठेकेदाराने उपलब्ध करून दिलेल्या सायकलीने १२ मजुरांनी तब्बल ३५० किलोमीटर प्रवास करून मध्य प्रदेशातील आपले मंडला गाव गाठले.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत होती. ही बाब त्यांनी आपले ठेकेदार हेमंत शृंगारपवार यांना सांगितली. त्यांनी येथेच रहा सर्व व्यवस्था होईल, असे सांगितले. मात्र कुणाचेही मन कामात लागत नव्हते. गावी पाठविण्यासाठी शक्कल लढविण्यात आली. शृंगारपवार यांनी सहा नव्या कोºया सायकली उपलब्ध करून दिल्या. त्या १२ जणांसोबत गावी पोहचेपर्यंतच्या जेवनाची व्यवस्था करून दिली. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हे १२ कामगार सायकलने आपल्या गावाकडे निघाले. मजल दरमजल करीत शनिवारी दुपारी १२ वाजता हे सर्वजन आपल्या गावात पोहचले. यादरम्यान त्यांनी तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास केला.

महानगरातून शेकडो मजूर गावाकडे जात आहे. अनेक कंत्राटदारानी आपल्या मजुरांना वाºयावर सोडले. मात्र अड्याळ येथील हेमंत शृंगारपवार यांनी मदतीचा हात दिला. गावी जाण्यासाठी सायकली उपलब्ध करून दिल्या. एवढेच नाही तर प्रवासात वारंवार या मजुरांसोबत मोबाईलवरून संवाद साधत होते. महाराष्ट्र मध्यप्रदेशाच्या सीमेवर या मजुरांना पोलिसांनीही मोठी मदत केली. सहृदय नागरिकांच्या सहकार्याने मजूर एकदाचे गावी पोहचले.

Web Title:  Workers travel 350 km cycle in the shadow of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.