महिलांनी स्वतःची ताकद ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:24+5:302021-02-05T08:41:24+5:30

०१ लोक २४ के तुमसर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिजाऊ होत्या. महिलांमध्ये मोठी ताकद असून ती ओळखायला हवी. ...

Women should recognize their own strengths | महिलांनी स्वतःची ताकद ओळखावी

महिलांनी स्वतःची ताकद ओळखावी

०१ लोक २४ के

तुमसर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिजाऊ होत्या. महिलांमध्ये मोठी ताकद असून ती ओळखायला हवी. महिलांनी स्वत:ची ताकद ओळखावी. जगात मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन अध्यक्षा कल्याणी भुरे यांनी व्यक्त केले.

स्थानिक मधू मिलन लॉन येथे उडान एक कदम आगे संस्थेतर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कल्याणी भुरे म्हणाल्या, महिलांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःसाठी जगले पाहिजे. एखाद्या खंबीर स्त्रीच्या मागेही तिचा पती उभा राहू शकतो. आयुष्यात अडचणी खूप असून त्यातून मार्ग काढला पाहिजे. महिलांनी स्वतःचे अस्तित्व टिकविले पाहिजे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रियांच्या हक्काकरिता उडान एक कदम आगे या संस्थेच्या माध्यमातून महिलापयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात, त्याची फलश्रुती म्हणून उडान संस्थेत महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना बळ देण्याचे काम संस्थेतर्फे होत आहे. त्यामुळे महिलांनी स्वऊर्जेने संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दीप प्रज्वलन करून तसेच हळदी-कुंकू व वाण देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले

त्यात सर्वसामान्य महिलांमधे चिठ्ठी टाकून मिस उडान ही स्पर्धा घेण्यात आली. मिस उडानची देवेश्वनी खोत ही विजेती ठरली तर महिलांच्या इतर स्पर्धेत रंजना ठाकरे... कांचन पडोळे, मंगला नाकाडे, कविता तितीरमारे, दर्शना राजपूत या विजेत्या ठरल्या. विजेत्यांना संस्थेतर्फे बक्षीस व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उडानच्या सर्व महिला सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Women should recognize their own strengths