शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी एकत्र येऊन ओबीसी जनगणनेबाबत जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

संजय मते : ओबीसी क्रांती मोर्चातर्फे महिला दिन भंडारा : प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहे. महिलांनी ...

संजय मते : ओबीसी क्रांती मोर्चातर्फे महिला दिन

भंडारा : प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहे. महिलांनी ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग द्या जेणेकरून ओबीसी जातीनिहाय जनगणना हा लढा आणखी प्रखर व तेज होईल. सर्व महिलांनी एकत्र येऊन ओबीसी जनगणनेबाबत जनजागृती करावी, ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिवादन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते यांनी केले. भंडारा शहर अध्यक्ष शोभा बावनकर व जिल्हा महासचिव शिल्पाताई खंडाईत व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या विद्यमाने ओबीसी क्रांती मोर्चा कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिल्पाताई खंडाईत या होत्या. प्रमुख पावणे जीवन भजनकर जिल्हा उपाध्यक्ष होते. महिला दिन म्हणजे एका महिला कामगार आंदोलनातून झाला. समस्त मानव जातील महिलांच्या प्रति असणाऱ्या माणुसकीच्या जाणिवा, सामान हक्क न्यायिक वागणूक याची जागृती करण्याच्या दृष्टीने भारतामध्ये मुंबई येथे पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला

मागील ७८ वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या चळवळीला काही प्रमाणात यश आले. म्हणूनच आपल्या देशात राष्ट्रपतींपासून तर देश रक्षणासाठी सैनिक म्हणून यशस्वी भूमिका महिला पार पाडत्यांना दिसत आहे. ७८ वर्षांनंतरही ओबीसी समाजावर होण्याऱ्या अन्यायावर महिलांनी सुद्धा एकत्र येत सन २०२१ च्या जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही, म्हणून आमचा सहभाग नाही, याची जनजागृती करणे आवश्यक आहे. आज ओबीसी जनगणना होत नसल्याने ओबीसी समाजाचा फार मोठे नुकसान होत आहे. ओबीसीच्या न्याय व हक्कासाठी बऱ्याच संघटना लढत आहे. संघटन ओबीसी क्रांती मोर्च्या ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे. संघटनेच्या वतीने दिल्ली येथे जंतर मंतरवर, मुंबईच्या आझाद मैदानावर व बऱ्याच मोठ्या शहरात जिल्हात, बऱ्याच राज्यात जाऊन ओबीसीचे विचार मांडत जनजागृती करत आहे. भंडारा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही जनजागृती आपल्याला मोठ्या उत्साहाने घरोघरी गावगावात शहरात पोहचवायची आहे. कार्यक्रमाच्यावेळी अध्यक्ष शोभा बावनकर, शिल्पाताई खंडाईत, माधुरी तुमाने, कल्पना नवखरे, सुरेखा भुरे, किरण मते, विद्या मदनकर, मीना ठवकर, कल्पना चांदेवार, श्वेता ब्राह्मणकर, प्रमिला थोंबरे, रेखा करंडे, प्रेरणा थोंबरे, श्वेता सेलोकर, कल्पना कावळे, मंगला वाडीभस्मे, प्रमिला डोरले मंगला माकडे, कल्पना चांदेवार आदी महिला उपस्थित होत्या.