शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

गटशिक्षणाधिकारी दहिवले यांनी शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे प्रलंबित न ठेवता जिल्हा परिषद येथे तत्काळ सादर करण्यात येतील, तसेच त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव फेरसादर करण्यात येतील, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषद येथे पाठविणे, अतिथी निदेशकांचे मानधन त्वरित अदा करणे, वेतनवाढीच्या नोंदी मूळ सेवापुस्तकांमध्ये घेणे, सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषदला पाठविणे, ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी अर्जित रजा घेणाऱ्या शिक्षकांचे वेतन रजा मंजुरी कारणास्तव अडविले जाणार नाही.

ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भंडारा तालुक्याच्या वतीने एका सभेचे आयोजन येथील गटसाधन केंद्रामध्ये सोमवारी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दिलीप बावनकर होते. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एच. के. दहिवले यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या कोणत्याही समस्या प्रलंबीत राहणार नाही. सर्व समस्यांची वेळेवर सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.यावेळी तालुकाध्यक्ष दशरथ जिभकाटे, सरचिटणीस ईश्वर निकुडे, जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कैलास बुद्धे, संचालक प्रकाश चाचेरे, यामिनी गिऱ्हेपुंजे, अनमोल रंगारी, मधुकर लेंडे, गणेश सारवे, शुद्धोधन बोरकर, राजकुमार चांदेवार, दिनेश खोब्रागडे, प्रभू तिघरे, प्रमोद गेडाम, रूपरेखा गिऱ्हेपुंजे, गीता तलमले, साधना जांभुळकर उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी दहिवले यांनी शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे प्रलंबित न ठेवता जिल्हा परिषद येथे तत्काळ सादर करण्यात येतील, तसेच त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव फेरसादर करण्यात येतील, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषद येथे पाठविणे, अतिथी निदेशकांचे मानधन त्वरित अदा करणे, वेतनवाढीच्या नोंदी मूळ सेवापुस्तकांमध्ये घेणे, सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषदला पाठविणे, ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी अर्जित रजा घेणाऱ्या शिक्षकांचे वेतन रजा मंजुरी कारणास्तव अडविले जाणार नाही. ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी रजा घेणाऱ्या शिक्षकांचे रजा मंजुरीचे आदेश मुख्याध्यापक यांना पाठविण्यात येतील, मूळ सेवापुस्तके अद्यावत करून दुय्यम सेवापुस्तकांमध्ये अद्यावत नोंदी घेण्यासाठी केंद्रानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करणे, विविध प्रशिक्षणाचे शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येतील, गोपनीय अहवालांच्या दुय्यम प्रती शिक्षकांना देणे तसेच अत्युत्कृष्ट गोपनीय अहवाल असणाºया शिक्षकांना अभिनंदन प्रमाणपत्र देण्यात येतील असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. संचालन तालुका सरचिटणीस ईश्वर निकुडे यांनी तर, आभार प्रदर्शन कैलास बुद्धे यांनी केले.

 

टॅग्स :Teacherशिक्षक