शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:23+5:30

गटशिक्षणाधिकारी दहिवले यांनी शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे प्रलंबित न ठेवता जिल्हा परिषद येथे तत्काळ सादर करण्यात येतील, तसेच त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव फेरसादर करण्यात येतील, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषद येथे पाठविणे, अतिथी निदेशकांचे मानधन त्वरित अदा करणे, वेतनवाढीच्या नोंदी मूळ सेवापुस्तकांमध्ये घेणे, सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषदला पाठविणे, ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी अर्जित रजा घेणाऱ्या शिक्षकांचे वेतन रजा मंजुरी कारणास्तव अडविले जाणार नाही.

Will solve teacher questions | शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार

शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार

Next
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भंडारा तालुक्याच्या वतीने एका सभेचे आयोजन येथील गटसाधन केंद्रामध्ये सोमवारी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दिलीप बावनकर होते. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एच. के. दहिवले यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या कोणत्याही समस्या प्रलंबीत राहणार नाही. सर्व समस्यांची वेळेवर सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष दशरथ जिभकाटे, सरचिटणीस ईश्वर निकुडे, जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कैलास बुद्धे, संचालक प्रकाश चाचेरे, यामिनी गिऱ्हेपुंजे, अनमोल रंगारी, मधुकर लेंडे, गणेश सारवे, शुद्धोधन बोरकर, राजकुमार चांदेवार, दिनेश खोब्रागडे, प्रभू तिघरे, प्रमोद गेडाम, रूपरेखा गिऱ्हेपुंजे, गीता तलमले, साधना जांभुळकर उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी दहिवले यांनी शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे प्रलंबित न ठेवता जिल्हा परिषद येथे तत्काळ सादर करण्यात येतील, तसेच त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव फेरसादर करण्यात येतील, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषद येथे पाठविणे, अतिथी निदेशकांचे मानधन त्वरित अदा करणे, वेतनवाढीच्या नोंदी मूळ सेवापुस्तकांमध्ये घेणे, सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषदला पाठविणे, ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी अर्जित रजा घेणाऱ्या शिक्षकांचे वेतन रजा मंजुरी कारणास्तव अडविले जाणार नाही. ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी रजा घेणाऱ्या शिक्षकांचे रजा मंजुरीचे आदेश मुख्याध्यापक यांना पाठविण्यात येतील, मूळ सेवापुस्तके अद्यावत करून दुय्यम सेवापुस्तकांमध्ये अद्यावत नोंदी घेण्यासाठी केंद्रानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करणे, विविध प्रशिक्षणाचे शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येतील, गोपनीय अहवालांच्या दुय्यम प्रती शिक्षकांना देणे तसेच अत्युत्कृष्ट गोपनीय अहवाल असणाºया शिक्षकांना अभिनंदन प्रमाणपत्र देण्यात येतील असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. संचालन तालुका सरचिटणीस ईश्वर निकुडे यांनी तर, आभार प्रदर्शन कैलास बुद्धे यांनी केले.

 

Web Title: Will solve teacher questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक