शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची मालकी कुणाची, दोन विभागात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

कर्कापूर - रेंगेपार व हरदोली असा सुमारे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. पंरतु हा रस्ता अर्धवट आहे. सुमारे ७००मीटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. आता या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. एसटी महामंडळाने या रस्त्याच्या अवस्थेने चक्क बसच बंद केली आहे.

ठळक मुद्देकर्कापूर-रेंगेपार रस्ता : ७०० मीटर रस्त्याचे बांधकाम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील कर्कापूर ते रेंगेपार रस्ता चिखलमय झाला असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना यांच्यात मालकीवरुन संभ्रम निर्माण झाला. आता हा रस्ता नेमका कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला असून ७०० मीटर रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कर्कापूर - रेंगेपार व हरदोली असा सुमारे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. पंरतु हा रस्ता अर्धवट आहे. सुमारे ७००मीटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. आता या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. एसटी महामंडळाने या रस्त्याच्या अवस्थेने चक्क बसच बंद केली आहे.आता या रस्त्याच्या दुरुस्तीवरुन मालकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना की जिल्हा परिषद बांधकाम विभाग यापैकी मालकी कुणाची असा सवाल आहे.यासंदर्भात गुरुवारी पंचायत समिती परिसरातील दोन्ही विभागांना भेटी दिल्या. दोन्ही विभागाच्या अभियंत्यानी रस्त्याच्या मालकीवरुन एकमेकांकडे बोट दाखविले. शासकीय विभागाला रस्त्याच्या मालकीवरुन प्रश्न पडल्याने कामकाजावर संभ्रम निर्माण झाल आहे.याकामाची सुरुवात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झाली. परंतु आता काम रखडल्याने सामान्य नागरिक भरडले जात आहे. या प्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक