शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जप्त रक्कम जाते कुठे ?

By admin | Updated: October 5, 2014 23:01 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक उमेदवार असतात. यावर अंकूश घालण्यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर असते. नाकेबंदी करुन वाहनांची

मतदारांत संभ्रम : नाकाबंदी, वाहन तपासणी केवळ फार्स असल्याची चर्चाचंद्रपूर : निवडणुकीच्या काळात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक उमेदवार असतात. यावर अंकूश घालण्यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर असते. नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. तपासणी दरम्यान लाखो रुपयांची रोकड सापडते. मात्र, जप्त केलेल्या रक्कमेचे पुढे काय होते, ही रक्कम जाते कुठे? असा प्रश्न मतदारांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाभरात प्रमुख मार्गावर पोलीस चौकी उभारुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तर निवडणूक विभागानेही पथक गठीत केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पत्तीस ते चाळीस लाख रुपयांची रोकड सापडली आहे. मात्र, या रक्कमेचे पुढे काय झाले, हे मतदारांना माहितच नाही. पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनांची चौकशी केली जात असून चौकशी दरम्यान संशय आल्यास किंवा माहिती देताना वाहनधारक अडखळल्यास त्याला ताब्यात घेतात. त्याची कसून चौकशी केली जाते. तर उमेदवारांचे निवासस्थान तसेच जनसंपर्क कार्यालयावरही नजर ठेवण्यात आली आहे. उमेदवाराच्या घरी व प्रचार कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर आयोगाची नजर आहे. या चौकशीचा मात्र, सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ओळखपत्र दाखवा, तुमच्या परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तीचे नाव सांगा, आदी प्रश्न विचारुन पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. निवडणूक काळात एखाद्याकडे रक्कम आढळल्यास त्या रक्कमेचा तपशील देणे गरजेचे आहे. अन्यथा सीआरपीसी कलम ४१ (ड) अंर्तगत बेहिशोबी अथवा संशयास्पद रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. मोठी रक्कम आढळ्यास आणि अशावेळी चौकशीत समाधानकारक उत्तर, कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्याची कायद्यात तरतुद आहे. रक्कमेचा प्राप्तिकर भरला आहे किंवा नाही याची चौकशी केली जाते. कागदपत्र न्यायालयात सादर केल्यानंतरच ती रक्कम संबधीला परत केली जाते. जर ही रक्कम निवडणूक कामासंबधीत असली तर, ती निवडणूक विभागाच्या खर्च संनियंत्रण विभागात जमा केली जाते. (स्थानिक प्रतिनिधी)