शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण केव्हा, ज्येष्ठांना सतावतेय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात  १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख  नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णतः बंद आहे. विद्यमान स्थितीत  नोंदणीही होत नाही. याशिवाय ज्येष्ठांचे लसीकरण आजही सुरु आहे.  ४५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक प्रथम व दुसरा डोस घेत आहेत. परंतु  ज्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रथम व नंतर दुसरा डोस घेतला, ती मंडळी आता कुटुंबातील तरुणांनाही व्हॅक्सिन कधी मिळेल, यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत.

ठळक मुद्देलसीकरणासाठी तरुणाईही आतुर : मोहीम सुरू होण्याची प्रतीक्षा

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच आपआपल्या जीवाची पर्वा वाटू लागली आहे.  अशातच  लसीकरण हा या महामारीवर संजीवनी उपाय म्हणून समोर आला आहे. शासनाने  ज्येष्ठांपासून लसीकरणाला सुरुवात केली. मात्र, सद्यस्थितीत लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने तरुणांचे लसीकरण थांबले आहे. परिणामी कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी होणार, याबाबतीत ज्येष्ठांची चिंता वाढली आहे.भंडारा जिल्ह्यात  १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख  नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णतः बंद आहे. विद्यमान स्थितीत  नोंदणीही होत नाही. याशिवाय ज्येष्ठांचे लसीकरण आजही सुरु आहे. ४५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक प्रथम व दुसरा डोस घेत आहेत. परंतु  ज्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रथम व नंतर दुसरा डोस घेतला, ती मंडळी आता कुटुंबातील तरुणांनाही व्हॅक्सिन कधी मिळेल, यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. लसीकरण झाल्यास या महामारीपासून आमच्या पाल्यांचा बचाव होऊ शकेल, या भूमिकेत ज्येष्ठ आहेत. शासनाने या  लस उत्सवाकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा जोमाने लसीकरण सुरू करावे, अशी बाब या ज्येष्ठांसोबत चर्चेदरम्यान समोर आली.  जिल्ह्यात आतापर्यंत दाेन लाख ६७ हजार ६०८ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डाेस घेणारे एक लाख ९८ हजार ५५७ व्यक्ती आहेत. तर दुसरा डाेस घेणारे ६९ हजार ५१ व्यक्ती आहेत. १८ ते ४४ वयाेगटात आतापर्यंत १२ हजार १३६ व्यक्तींनी पहिला डाेस घेतला असून दुसरा डाेसची त्यांना प्रतीक्षा आहे. काेराेना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे तरुणाई सर्वाधिक घराबाहेर पडते. त्यामुळे त्यांना संसर्गाचा अधिक धाेका असताे. १८ ते ४४ वयाेगटातील तरुणांचे लसीकरण तात्काळ सुरु करावी, अशी मागणी लस घेतलेले ज्येष्ठ व्यक्ती करीत आहे. आता या वयाेगटातील लसीकरण केव्हा सुरु हाेणार हे मात्र अनिश्चित दिसत आहे.

माझी दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर असतात. मध्यंतरी कोरोना रुग्ण वाढीने चिंता वाढली होती. लसीकरणानंतर तेवढी चिंता राहात नाही. मी लस घेतली. पण, दोन्ही मुलांचे लसीकरण व्हायचे आहे.- रामकृष्ण नंदनवार, भंडारा

मी एप्रिल महिन्यातच लस घेतली. आता दुसरा डोसही घेणार आहे. पण, माझ्या मुलांचे लसीकरण न झाल्याने चिंता सतावते. पुन्हा मोहीम सुरू होताच त्यांना लसीकरणासाठी पाठविणार आहे. - मनोज दलाल,भंडारा 

मुलांचे भविष्य सर्वच बाबतीत उज्ज्वल असावे, अशी पालकांची इच्छा असते. विशेषत: आरोग्याविषयी मी जागरूक आहे. माझ्या मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यास चिंता राहणार नाही. -गिरीशचंद्र उजवणे,साकोली

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या