शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाडी सुरू होण्याचा मुहूर्त केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

रेल्वे प्रशासन या बाबीची दखल घेणार की नाही, असा सवाल प्रवासी विचारत आहे. एक पॅसेंजर गाडी सुरू केली असली तरी त्यामध्ये चांगलीच गर्दी असते. कोरोनाचे संकट टळले नाही. तर दुसरीकडे एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढावे लागत असल्याने आर्थिक लूट सुरू आहे. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी नेमकी अडचण काय, असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून बंद केलेल्या काही पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाही तर इतवारी-दुर्ग ही लोकल गाडीसुद्धा अद्यापही बंदच आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या गाड्या केव्हा सुरू करणार म्हणून प्रवासी वांरवार विचारणा करीत आहे. रेल्वे प्रशासन या बाबीची दखल घेणार की नाही, असा सवाल प्रवासी विचारत आहे. एक पॅसेंजर गाडी सुरू केली असली तरी त्यामध्ये चांगलीच गर्दी असते. कोरोनाचे संकट टळले नाही. तर दुसरीकडे एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढावे लागत असल्याने आर्थिक लूट सुरू आहे. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी नेमकी अडचण काय, असा सवाल केला जात आहे.

केवळ याच पॅसेंजर सुरू - भंडारा रोड (वरठी)  रेल्वे स्थानकावर फक्त एक पॅसेंजर गाडी सुरू आहे. नागपूर ते रायपूर असे या पॅसेंजर गाडीचे नाव आहे. अन्य पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांना नाहक पैसे अधिक मोजून एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे

सुरू असलेल्या एक्स्प्रेस गाड्या - हावडा-मुंबई मेल- अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस- समता एक्सप्रेस- आझादहिंद एक्सप्रेस- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस- अजमेर-पुरी एक्सप्रेस- हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस

प्रवाशांच्या खिशाला झळ....रेल्वे विभागाने इतर एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढविली आहे. मग केवळ लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय काय? एक्स्प्रेस गाड्यांच्या नावाखाली सुरू केलेली लूट त्वरित थांबवावी.     - संतोष दुधबरई, प्रवासीकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेने पॅसेंजर, लोकल गाड्या बंद केल्या त्या अद्यापही सुरू केलेल्या नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - अंशुल मारबते, प्रवासी 

जनरल तिकीट बंदच

- एक्स्प्रेस गाड्यांना अद्यापही जनरलचे डब्बे जोडण्यात आले नाही. त्यामुळे जनरल तिकिटांची विक्री बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.- काही लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी या गाड्यांमध्ये एक्स्प्रेसचे तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे