शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन: धान पिके लागली करपायला

By admin | Updated: September 29, 2014 23:00 IST

विद्युत महामंळाकडून जांब परिसरात कृषी पंपाच्या लाईनचा दिवसातून १६ तासाचा भारनियमन होत असल्याने धान पिकाला पाणी वेळेवर मिळत नसल्याने जांब, लोहारा परिसरातील धान पिके

जांब (लोहारा) : विद्युत महामंळाकडून जांब परिसरात कृषी पंपाच्या लाईनचा दिवसातून १६ तासाचा भारनियमन होत असल्याने धान पिकाला पाणी वेळेवर मिळत नसल्याने जांब, लोहारा परिसरातील धान पिके करपू लागले आहे. यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडले असून शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे.जांब, लोहारा परिसरातील धान पिके गर्भाअवस्थेत आहे. यावेळी धान पिकाला भरपूर पाण्याची गरज असते. पावसाने डोळे वटाळले असले तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरी, बोळ्या, नाले, तलाव या ठिकाणी पाणी साचलेला आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाने, करपत असलेल्या धान पिकाला पंपाने पाणी देणे सुरू आहे. पण विद्युत महामंडळाकडून दिवसातून फक्त ८ तास विद्युत पुरवठा सुरू ठेवतात बाकीचे १६ तास कृषी पंपाचा भारनियमन करित असल्याने ८ तासामध्ये धान पिकाला पाणी देवून धान पिके वाचविता येत नाही व शेतकऱ्याकडे पाणी असूनही धान पिक करपू लागले असल्याने शेतकरी संकटात आहेत. हातात आलेले धान पिक जाणार असल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. संबंधित शाखा अभियंता यांच्याशी शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या भारनियमना संदर्भात चर्चा केली असता वरिष्ठस्तरावरूनच भारनियमन करण्याचे आदेश असून तो कमी करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे सुद्धा संबंधित अभियंत्याकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. कृषी पंपाचे भारनियमन बंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)