शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST

भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देपाण्याला दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी नदी स्वच्छता गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा वाढत चालला असून नदीचे पाणी दुषित झाले आहे. नदीपात्रातील पाण्यावर ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन वाढले असून पाण्यावर शेवाळ पसरले आहे. त्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरत असून नदीकाठच्या नागरिकांसह शहरवासीयांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे. यातच नदीपात्रात अनेक गावातील सांडपाणी देखील मिसळत असून नागनदीचे पाणी सोडण्यात येत असल्याने वैनगंगा दुषित होत चालली आहे.नदीकाठच्या नागरिकांना दूषीत पाण्याने विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने येथे अनेक तरुण जमा होतात.अनेकदा शेतकरी नदीमध्ये मृत जनावरे टाकतात. तसेच ठिकठिकाणचा कचरा व सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नदी धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी गत काही वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. अनेकदा आंदोलन व निवेदन देवून नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले नाही. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात नदीचे पाणी पिण्यास धोकादयक ठरणार आहे. शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान मंजूर होवूनही याकडे दुर्लक्ष आहे. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.नदीच्या पाण्याला हिरवट-लालसर रंगनागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमिकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर लाल झाला आहे.

टॅग्स :riverनदी