शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटली, २० लक्ष लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: May 25, 2017 00:14 IST

नाला खोलीकरणाचे खोदकाम करताना जेसीबीने तुमसर नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटली.

तुमसरात कृत्रिम पाणीटंचाई : जिल्हा परिषद नाला खोलीकरण करताना घडली घटनालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नाला खोलीकरणाचे खोदकाम करताना जेसीबीने तुमसर नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटली. यात जवळपास २० लक्ष लिटर पाण्याची नासाडी झाली. पाण्यामुळे नाला दुथडी भरून वाहू लागला. याचा फटका तुमसरकरांना बसला. आज पाणीपुरवठा झालाच नाही. दुसरीकडे नगर पालिका प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून लिकेज दुरुस्त केले. जिल्हा परिषदेमार्फत देव्हाडी (माडगी) शिवारात नाला खोदकाम सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या निष्काळजीपणामुळे येथे पाणी व्यर्थ गेले.शहराला माडगी येथील वैनगंगेतून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या, देव्हाडी (माडगी) शिवारातून जातात. जिल्हा परिषद देव्हाडी शिवारातील नाला खोदकाम, खोलीकरण तथा सरळीकरणाचे कामे करीत आहेत. जेसीबीने सदर कामे करताना तुमसर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नाल्याजवळून जाते. खोदकाम करताना जेसीबीने जलवाहिनी फुटली. मोठा लिकेज जलवाहिनीत निर्माण झाले. पाहता पाहता नाला तुडूंब वाहू लागला. एवढे पाणी कुठून आले याविषयी येणाऱ्या -जाणाऱ्यांचे लक्ष गेले. पालिका प्रशासनाला याची माहिती तोपर्यंत नव्हती. रात्रीला तुमसर शहरातील जलकुंभात पाणी का आले नाही याची चौकशी सुरु झाली. नंतर देव्हाडी शिवारात मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याचा प्रकार उघडकीस आला. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर, इतर नगरसेवक, पाणीपुरवठा अभियंता गणवीर तथा तांत्रिक कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून २४ तासात लिकेज दुरुस्त केले. संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती नगराध्यक्षांनी संबंधित अभियंत्यांना दिली. दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती येथे निर्माण झाली होती.पाणी टंचाईवर मात करण्याकरिता नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची तथा निष्काळजीपणाची माहिती जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्वरीत दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. -मेहताबसिंग ठाकुर, पाणीपुरवठा सभापती, तुमसर